महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांच्यात संशोधक वृत्ती वाढवण्याचे प्रमुख साधन म्हणजे अविष्कार संशोधन
स्पर्धा.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यात संशोधक वृत्ती
वाढवण्याचे प्रमुख साधन म्हणजे अविष्कार संशोधन स्पर्धा
____ प्रो. डॉ. उज्ज्वला ताठे
कराड - प्रतिनिधी.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर
संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे महाविद्यालयीन
स्तरावरती अविष्कार संशोधन स्पर्धा 2025 /26 उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेचे प्रमुख परीक्षक व
प्रमुख पाहुणे म्हणून प्रो.डॉ उज्वला ताठे इंग्रजी विभाग प्रमुख महिला महाविद्यालय
कराड या होत्या. आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात त्या म्हणाल्या, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यात संशोधक वृत्ती
वाढवण्याचे प्रमुख साधन म्हणजे अविष्कार स्पर्धा होय. या स्पर्धेत सहभागी होताना
विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास असेल तर सादरीकरण उत्तम होते. . प्राथमिक व
द्वितीयक माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांनी अचूक पुराव्यासह संशोधन प्रकल्प तयार
केला पाहिजे. आवश्यक आकडेवारी, नकाशे व सांख्यिक माहितीच्या आधारे पोस्टर शास्त्रीय
पद्धतीने तयार करणे अपेक्षित असते. यासाठी विद्यार्थ्यांनी स्वय: अध्ययनावर भर
दिला पाहिजे. विषय समजून घेऊन गृहीतकांची मांडणी करणे अपेक्षित आहे. लिहिलेल्या
भागांमध्ये व्याकरणाचाही वापर असावा. आपण जे पोस्टर तयार केलेले असते ते अचूक
पुराव्याच्या आधारे सादरीकरणाच्या वेळी स्पष्ट करता आले पाहिजे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे
प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, अविष्कार स्पर्धेच्या निमित्ताने जसे विद्यार्थी तयार
होतात तसेच प्राध्यापक ही तयार होतात. संशोधनाचे आकलन ही अत्यंत महत्त्वाची बाब
आहे कारण कोणताही जगातील देश संशोधनावरच उभा असतो. त्याची प्रगती होते. शिक्षणाचे
अंतिम ध्येय विद्यार्थ्यांचे परिवर्तन आहे. विद्यार्थी सकारात्मक दृष्ट्या
वैज्ञानिक पायावरती उभे असतील तर देशाला उज्वल दिवस आल्या वाचून राहणार नाहीत.
यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करून स्वतःमधील संशोधक वृत्ती आपण जागी केली पाहिजे.
आणि यातूनच राष्ट्र घडणार आहे.
या
अविष्कार स्पर्धेमध्ये भूगोल विभागाची विद्यार्थिनी प्रणाली जगदाळे हिचा प्रथम
क्रमांक आला. तिला प्रा. दिपक गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. कुमारी वैष्णवी जाधव
हिचा द्वितीय क्रमांक आला तिला अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मारुती सूर्यवंशी व
सहकाऱी यांचे मार्गदर्शन लाभले. तृतीय क्रमांक वैभवी पाटील हिचा आला. तिला
समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दादासाहेब घाडगे व सहकारी यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच उत्तेजनार्थ क्रमांक सुहानी काळे इतिहास विभाग व राज्यशास्त्र विभागाची ऋणाली
बुधे यांना देण्यात आले.तसेच कार्यक्रमात आलिजा मोमीन व प्रणाली जगदाळे यांनीही
मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविष्कार संशोधन स्पर्धेचे समन्वयक
डॉ. मारुती सूर्यवंशी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय स्वाती मोरकळ यांनी केला.
आभार डॉ.आशा सावंत यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन डॉ. शितल गायकवाड यांनी केले.
या स्पर्धेत महाविद्यालयातील सर्व विभागांनी सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी सर्व
विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक बंधू-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment
Thanks for reply