राष्ट्रीय
एकात्मता आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे उपयुक्त माध्यम म्हणजे हिंदी भाषा.
राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे
उपयुक्त माध्यम म्हणजे हिंदी भाषा.
___डॉ. वैशाली शिंदे
कराड - प्रतिनिधी .
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे हिंदी दिन समारोह उत्साहात
संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कडेपुर. जिल्हा.
सांगलीच्या डॉ. वैशाली शिंदे होत्या. त्या आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या, राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक देवाण-घेवाणीचे
उपयुक्त माध्यम म्हणजे हिंदी भाषा आहे. भारतीय संविधानाने हिंदी ला राज भाषेचा
दर्जा दिला आहे. हिंदी भाषेविषयी प्रत्येक व्यक्तीला आकर्षण आहे. कारण संपूर्ण
भारतामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी ही भाषा आहे. स्वातंत्र्य काळात देशातील
अनेक स्वातंत्र्यवीरांनी संपूर्ण देशभर हिंदी भाषेतच भाषणे केलेली होती .
त्यामुळेच योग्य संदेश लोकांच्या पर्यंत पोहोचत होते. येणाऱ्या काळात हिंदी भाषेचा
प्रचार व प्रसार होऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे सर होते. आपल्या
अध्यक्ष मार्गदर्शनात ते म्हणाले, हिंदी भाषा बोलायला साधी, सोपी व सरळ आहे. आपण ज्या वेळेस मातृभाषेत विचार करून
तो विचार दुसऱ्या भाषेत व्यक्त करताना अडचणी येतात. परंतु ज्या भाषेत बोलायचे
त्याच भाषेत विचार केला तर बोलणे सोपे होऊन जाते. विद्यार्थ्यांनी बहुभाषा शिकणे
अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण स्पर्धेच्या युगात पुढे जायचं असेल तर आपल्याला हिंदी
सारखी भाषा, इंग्रजी
सारखी भाषा शिकणे अनिवार्य आहे. हिंदी दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना
शुभेच्छा देतो!
हिंदी दिनाच्या निमित्ताने विद्यार्थिनी सिद्धी
केंगार हिने मनोगत व्यक्त केले. प्राध्यापक प्रतिनिधी म्हणून भूगोल विभाग प्रमुख
डॉ. सुभाष कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. हिंदी दिनाच्या निमित्ताने हिंदी
विभागाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भित्तिपत्रिकेचे उद्घाटन संपन्न
झाले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी प्राध्यापक प्राध्यापिका बहुसंख्येने
उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्युनिअर विभागाचे प्रा. अण्णासाहेब
पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.शितल गायकवाड यांनी
केला.सूत्रसंचालन प्रा. सविता येवले यांनी केले तर आभार हिंदी विभाग प्रमुख प्रा.
विश्वनाथ सुतार यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्रा. रुपाली यादव यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment
Thanks for reply