समर्पणाच्या भावनेने काम करा यश नक्कीच मिळेल. - प्रा.डॉ. विनायक पवार
कराड (प्रतिनिधी):
आयुष्यात संघर्ष हा प्रत्येकालाच करावा लागतो. अनंत अडीअडचणींना सामोरे जावे लागते. झगडावे लागते. परंतु कामाप्रती समर्पणाची भावना असेल तर उशिरा का होईना यश नक्कीच मिळते. तेव्हा विवेकानंद शिक्षण संस्थेत काम करताना बापूजींना अभिप्रेत असणाऱ्या समर्पणाच्या भावनेने काम करा. यश नक्कीच मिळेल असे आवाहन सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार व कवी प्रा.डॉ. विनायक पवार यांनी केले.
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे मराठी विभागाच्या वतीने आयोजित लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्र. प्राचार्य डॉ.महेश गायकवाड तसेच मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सौ उज्वला पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. डॉ. पवार पुढे म्हणाले, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आनंदी राहिले पाहिजे. यासाठी वाचनाबरोबर विद्यार्थ्यांनी लेखन केले पाहिजे. अभिव्यक्त झाले पाहिजे.
अध्यक्षीय मनोगतात प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड म्हणाले, एका तांड्यावरून आलेला माणूस साहित्यिक, चित्रपट गीतकार होतो. अभिनेता म्हणून नावलौकिक मिळवतो, तरीही विनम्र राहतो. हा आदर्श विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांनी देखील काव्य निर्मितीचा व लेखनाचा प्रयत्न केला पाहिजे. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी विविध कवितांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा व सुचकपणे मार्गदर्शन करण्याचे काम केले. विद्यार्थ्यांनीही या कवितांना मनमोकळेपणाने उस्फूर्त दाद दिली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. उज्वला पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दयानंद कराळे यांनी तर आभार प्रा सुरेश रजपूत यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित होते.
फोटो कॅप्शन :
लेखक आपल्या भेटीला या मराठी विभागाच्या उपक्रमांतर्गत मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. विनायक पवार सोबत प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सौ उज्वला पाटील.
फारच छान
ReplyDeleteछान आहे
ReplyDeleteखूप छान सादरीकरण
ReplyDeleteNice Activity
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteछान
ReplyDeleteNice
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteVery nice
ReplyDelete