Tuesday, January 27, 2026

विशेष श्रम संस्कार शिबिरातूनच मिळते विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली:- प्राचार्य शशिकांत काटे.

 

विशेष श्रम संस्कार शिबिरातूनच मिळते विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली:- प्राचार्य शशिकांत काटे.

A group of people sitting in chairs

AI-generated content may be incorrect.

 

श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था संचलित शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड व ग्रामपंचायत मौजे कालवडे येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर 3 जानेवारी ते 9 जानेवारी 2026 या कालावधीत उत्साहात संपन्न झाले. शिबिराच्या समारोपाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राचार्य शशिकांत काटे सातारा जिल्हा विभाग प्रमुख, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर हे  होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, विशेष श्रम संस्कार शिबिरातूनच मिळते विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली. शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्रमदानाचे संस्कार तर होतातच, परंतु विविध प्रबोधन पर कार्यक्रमातून ज्ञानविज्ञानाची ही ओळख होते. शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांनी ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे आपल्या सर्वांना विचारविश्व दिले. शिबिरामध्ये देखील विद्यार्थी ज्ञान विज्ञान तर घेतातच परंतु श्रम संस्काराचे धडे देखील गिरवतात. ग्रामीण भागात अशा श्रमसंस्कार शिबिरातून अनेक विकास कामे करता येतात. ग्राम स्वच्छता, वृक्षारोपण, रस्ता दुरुस्ती, वनराई बंधारे अशी अनेक कामे केली जातात. त्यामुळे गावचा विकास होण्यास मदत होते.

                   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, या सात दिवसांमध्ये सर्व स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी अत्यंत चांगले श्रमदानंतर केलेच आहे. परंतु सर्वेक्षणासारखे ग्रामपूरक कार्यक्रम देखील हाती घेतले व पूर्ण केले. हे अभिमान स्पद आहे. राष्ट्रीय सेवा योजना हेच खऱ्या अर्थाने विद्यार्थी जीवन फुलवण्याचे व्यासपीठ आहे.

                 या समारोप प्रसंगी कालवडे गावचे प्रथम नागरिक माननीय सरपंच सुदाम मोठे उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य मा. बालिश थोरात, ग्रामपंचायत सदस्य सौ गीतांजली थोरात यांनी आपली मनोगते व्यक्त केली. काही शिबिरार्थी विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. मारुती सूर्यवंशी यांनी केले. आभार ग्रामपंचायत सदस्य बालिश थोरात यांनी व्यक्त केले. तर सूत्रसंचालन डॉ. शितल गायकवाड यांनी केले. या समारोपासाठी कालवडे गावातील विविध पदाधिकारी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच सर्व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. रघुनाथ गवळी, प्रा. अण्णासाहेब पाटील व सदस्य, स्वयंसेवक विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

 

 

तंत्रज्ञानाच्या युगात युवा पिढीला सुसंस्कारित करण्याचा रामबाण उपाय म्हणजे ग्रंथ वाचन______ प्राचार्य प्रो.डॉ.सतीश घाटगे

 

तंत्रज्ञानाच्या युगात युवा पिढीला सुसंस्कारित करण्याचा रामबाण उपाय म्हणजे ग्रंथ वाचन______ प्राचार्य प्रो.डॉ.सतीश घाटगे

A group of people sitting in a classroom

AI-generated content may be incorrect.

 

 

श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय येथे श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह व मराठी भाषा पंधरवडा यानिमित्ताने ग्रंथालय विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्ञान शिदोरी दिन, उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ वाचन, व ग्रंथदान करण्यात आले. या समारंभाचे उद्घाटक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, तंत्रज्ञानाच्या युगात युवा पिढीला सुसंस्कारित करण्याचा रामबाण उपाय म्हणजे ग्रंथ वाचन होय. आज महाविद्यालयात संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञान शिदोरी दिन साजरा होत असताना ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ वाचन व ग्रंथदान हा अतिशय स्तुत्य उपक्रम ग्रंथालय विभाग व मराठी विभागाच्या वतीने राबविण्यात आला आहे. विद्यार्थी जीवनात जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन केले तर भविष्यकाळात येणारी अनेक आव्हाने आपण पार करू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हटले आहे हे दूध जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ग्रंथच आपले व्यक्तिमत्व परिवर्तन करू शकतात. विकसित भारताच्या उभारणीसाठी केवळ तंत्रज्ञान अवगत असलेली युवा पिढी उपयुक्त ठरणार नाही. ती सुसंस्कारित असणे तितकेच महत्त्वाचे आहे. संस्थेचे आराध्य दैवत शिक्षणमहर्षी बापूजींनी ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार हे विचार विश्व दिले. याच विचार विश्वाची गरज आजच्या युवा पिढीला आहे. पुस्तक वाचनाने विद्यार्थी ज्ञानात्मक, क्रियात्मक आणि भावात्मक पातळीवरती तयार होत असतो. त्यामुळे ग्रंथासारखा मित्र प्रत्येकाने जोपासला पाहिजे. आज या ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथदान व ग्रंथ वाचन समारंभाचे उद्घाटन झाल्याचे मी जाहीर करतो!

                   या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी व गुरुदेव कार्यकर्त्यांनी सामूहिक ग्रंथ वाचन केले. गुरुदेव कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाकडे ग्रंथ दान केलेले ग्रंथ विद्यार्थ्यांना विनामूल्य देण्यात आले. ग्रंथ प्रदर्शन ग्रंथालय विभागाने सर्वांसाठी खुले ठेवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा.सोनाली रांगोळे यांनी केले . आभार मराठी विभाग प्रमुख प्रा. रघुनाथ गवळी यांनी व्यक्त केले.  सूत्रसंचालन प्रा.शितल सालवाडगी यांनी केले. या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये प्रा. स्मिता कालभूषण यांनी सहभाग घेतला. ग्रंथालय कमिटीचे प्रा. सचिन बोलाईकर, डॉ. मारुती सूर्यवंशी, प्रा. विश्वनाथ सुतार, प्रा. ज्योती धर्माधिकारी, ग्रंथालय विभागाच्या प्रा. सुषमा चंदुगडे, सेन मॅडमसांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सुभाष कांबळे, प्रा. सुरेश यादव व महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.

समाजाच्या प्रगतीसाठी स्त्रियांचे आरोग्य जपणे काळाची गरज :- अश्विनी आलदर.

 

समाजाच्या प्रगतीसाठी स्त्रियांचे आरोग्य जपणे काळाची गरज :- अश्विनी आलदर.

 

A group of people in a classroom

AI-generated content may be incorrect.

 

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाच्या निमित्ताने महिला सबलीकरण आणि लैंगिक समानता कक्षाच्या वतीने महिलांचे आरोग्य या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते प्रमुख मार्गदर्शिका अश्विनी आलदर संस्थापक कॉटन ग्रीन सॅनिटरी नॅपकिन्स या होत्या आपल्या मार्गदर्शनात त्या म्हणाल्या प्रगतीसाठी महिलांचे आरोग्य जपणे काळाची गरज आहे. 

 स्त्री ही कुटुंबाची आणि समाजाची आधारस्तंभ असते. त्यामुळे तिचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. विशेषतः मासिक पाळीच्या काळात स्वच्छता राखणे हे स्त्रीच्या आरोग्याशी थेट संबंधित असते. या काळात सॅनिटरी नॅपकिनचा वापर केल्याने शरीर स्वच्छ राहते. संक्रमण टळते आणि आत्मविश्वास वाढतो. पूर्वी अनेक स्त्रिया वापरलेले कापड पुन्हा वापरत असत. ज्यामुळे संसर्ग आणि त्वचेचे आजार होण्याचा धोका वाढायचा. परंतु सॅनिटरी नॅपकिनच्या वापरामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. हे नॅपकिन्स मऊ, शोषक आणि वापरण्यास सोयीस्कर असल्यामुळे महिलांना शाळा, कामाची ठिकाणे किंवा प्रवास यांमध्येही निर्भयपणे राहता येते. यामुळे केवळ स्त्रियांचे आरोग्य सुधारत नाही, तर त्यांचा आत्मविश्वास आणि सामाजिक सहभागही वाढतो. सॅनिटरी नॅपकिनचा वापर हा आरोग्य, स्वच्छता आणि स्त्री सक्षमीकरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीपर्यंत याचा प्रसार होणे आवश्यक आहे, कारण निरोगी स्त्री म्हणजे निरोगी समाज.

           कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते, आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले संपूर्ण आयुष्यात स्त्रियांना विविध भूमिका निभवाव्या लागतात. कधी आई, पत्नी, सून, सासू, नणंद अशा अनेक भूमिका निभावत असताना त्या कुटुंबाची काळजी करत असतात मात्र त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे त्यांनी वेळीच आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. कारण ज्या समाजात स्त्रिया सक्षम असतात तोच समाज प्रगती करत असतो.

                 कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सोनाली रांगोळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. मनाली रानडे यांनी केला. प्रा. ऋतुजा भाटले यांनी आभार व्यक्त केले. तर सूत्रसंचालन प्रा. रुकय्या  शेख यांनी केले. कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक सुरेश यादव,सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी, गुरुदेव कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

काव्य गायनाने रंगला माता सावित्रीबाईंच्या जयंतीचा सोहळा.

 

काव्य गायनाने रंगला माता सावित्रीबाईंच्या जयंतीचा सोहळा.

A group of people in a classroom

AI-generated content may be incorrect.

 

  

 श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, शिक्षणमहर्षी .बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे महिला सबलीकरण आणि लैंगिक समानता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई उत्सव काव्यवाचन अतिशय उत्साहात संपन्न झाले. महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते आपल्या मार्गदर्शनात   ते म्हणालेसावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणजे नवीन वर्षातला पहिला उत्सव. त्यामुळे त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हायलाच  हवी. जेव्हा आपण एखाद्या थोर व्यक्तीमत्वाची वेशभूषा परिधान करत असतो. तेव्हा नकळतपणे त्यांचे विचार त्यांचे व्यक्तिमत्व हे आपल्यामध्ये संचारत असते. तसेच दैनंदिन जीवनात आपण तसे वागावे याची जाणीव करून देत असते. तात्कालीन परिस्थितीमध्ये स्त्रीला माणूस म्हणूनच अधिकार नसताना शिक्षणाचा अधिकार मिळणे ही फार मोठी गोष्ट होती. सावित्रीबाईंनी त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाची द्वारे खुली करण्यासाठी आपले जीवन व्यतीत केले. त्या महात्मा फुले यांची सावली बनून न राहता त्यांनी स्वतःच एक वेगळे व्यक्तिमत्व सिद्ध करून समाजकार्य व लेखन कार्य करत राहिल्या.

 आजच्या मुलींनी त्यांच्या या कार्याची आठवण ठेवून स्वतःला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सिद्ध करावे. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्यावर समर्पित काव्यवाचन करण्यासाठी  केंगार रिद्धी ,अमृता डवरी या  दोन विद्यार्थिनींनी काव्यवाचन केले. तर प्राध्यापकांमध्ये  डॉ. शितल गायकवाड ,प्रा.सुषमा चंदुगडे, प्रा.प्रियांका मदने , प्रा.डॉ.स्वाती मोरकळ ,प्रा.शैला चोबे , डॉ आशा सावंत , प्रा. ऋतुजा भाटले प्रा. दिपाली वाघमारे प्रा. तेजस्विनी दळे , प्रा शितल सालवाडगी , प्रा सुरेश रजपूत ,प्रा जीवन आंबुडारे , प्रा.अभिजीत दळवी या सर्वांनी काव्य वाचन केले महाविद्यालयाचे एनसीसी प्रमुख प्रा. दिपक गुरव यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची वेशभूषा करून कार्यक्रमास रंगत आणली.प्रास्ताविक महिला सबलीकरण आणि लैंगिक समानता कक्षाच्या समन्वयक प्रा. सोनाली रांगोळे यांनी केले    सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मी जाधव यांनी केले.  आभार प्रा.शैला चोबे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

रा.से.यो विशेष श्रमसंस्कार शिबिरात काव्य सुरांनी रंगली सायंकाळ.

 

रा.से.यो विशेष श्रमसंस्कार शिबिरात काव्य सुरांनी रंगली सायंकाळ.

A group of people sitting in chairs

AI-generated content may be incorrect.


श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामपंचायत कालवडे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या विशेष संस्कार शिबिरात कवी संमेलन अत्यंत उत्साहात संपन्न झाले. कवी थळेन्द्रकुमार लोखंडे व कवी उद्धव पाटील यांच्या काव्य सुरांनी सायंकाळची वेळ रंगून गेली. अनंत अडचणीतून संघर्षाची वाट तुडवताना कविता जन्म घेते. कविता जगायला शिकवते. जनसामान्याच्या वेदनेला वाचा फोडते. चळवळीतील तरुणाला ऊर्जा देते. थकलेल्या भागलेल्या देहाला जगायची स्फूर्ती देते. असे प्रतिपादन कवी थंळेन्द्र कुमार लोखंडे यांनी केले.

               कवी उद्धव पाटलांनी छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांची आठवण आपल्या काव्यातून करून दिली. युवकांना खऱ्या तारुण्याची जाणीव करून दिली. त्यांनी प्रेम कविता, सामाजिक व देशभक्तीपर कवितांचे गायन केले. तसेच स्वयंसेवक विद्यार्थी व प्राध्यापकांनीही आपल्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य बालेशराव थोरात होते. मानवी जीवनाचे मर्व मर्म कविता शिकवते. समाजाच्या वेदना कविता दाखवते. विद्यार्थ्यांनी कवितेचा छंद जोपासावा.

                कार्यक्रमाचे प्रास्ताविक, परिचय, स्वागत, आभार, सूत्रसंचालन स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम अधिकारी डॉ. मारुती सूर्यवंशी, प्रा. रघुनाथ गवळी, प्रा.अण्णासाहेब पाटील व सर्व कमिटी सदस्यांनी केले. कवी संमेलनासाठी ग्रामस्थ, स्वयंसेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

सामाजिक बांधिलकी जपण्याची सुवर्णसंधी म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना ____प्रा. अधिकराव कणसे

 


A person speaking into a microphone

AI-generated content may be incorrect.


श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामपंचायत कालवडे यांच्या संयुक्त विद्यमाने 3 जानेवारी 2026 ते 9 जानेवारी 2026 या कालावधीत विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न होत आहे. शिबिरातील राजकीय सेवा योजना व स्फूर्ती गीते प्रबोधन पर कार्यक्रमात पहिले पुष्प गुंफण्यासाठी  प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. अधिकराव कणसे होते.आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, सामाजिक बांधिलकी जपण्याची सुवर्णसंधी म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना होय. मन, मनगट, मेंदूच्या बळावरती माणसं शून्यातून विश्व निर्माण करतात. याची अनेक उदाहरणे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून पहावयास मिळतात. आपल्या वक्तृत्वाच्या जीवावरती राजकीय पटलावरती आपले व्यक्तिमत्व उंची वरती नेणारे आर. आर. (आबा) पाटील राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री झाले . समाजाची सेवा करून बाबा आमटे यांनी जनमानसात आपले अढळ स्थान निर्माण केले. गावातील ग्राम स्वच्छता करता करता परस्परातील मनभेदांची सफाई झाली त्यामुळेच जगास प्रेम बंधू भावाच्या पटलावरती घेऊन जाण्यास राष्ट्रीय सेवा योजना समाज जागृती चे प्रमुख साधन आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसन निर्मूलन, शेतीच्या समस्या, आरोग्याच्या समस्यास्त्री शक्तीचा जागर असेल असे एक ना दोन अनेक प्रश्न राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतात. या शिबिरांमधील सर्व शिबिरार्थी नक्कीच समाजसेवेचा आदर्श निर्माण करतील असे मला वाटते.

              या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेची स्फूर्ती गीते माननीय प्राचार्य प्रो. डॉ.सतीश घाटगे  यांनी सादर केली. सर्व स्वयंसेवक स्वयंसेविका यांना ही गीते त्यांनी गायला लावली. त्यामुळे कार्यक्रमात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. आपल्या मार्गदर्शनात सर म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या या गीत गायनाने स्वयंसेवक व स्वयंसेविकांना श्रम करण्याची प्रेरणा मिळते व या श्रमसंस्कारातून समाजसेवा घडते.

             कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूरचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय थोरात होते. राष्ट्रीय सेवा योजना स्फूर्ती गीते व जबाबदारीची जाणीव करून देणारा आजचा हा कार्यक्रम प्रेरणादायी आहे.

                 कार्यक्रमाचे प्रास्ताविक, आभार, सूत्रसंचालन स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनी, ग्रामस्थ बंधू -भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी डॉ. मारुती सूर्यवंशी, प्रा. रघुनाथ गवळी, प्रा. अण्णासाहेब पाटील व सर्व एनएसएस कमिटी कमिटीतील सदस्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

र्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ.मारुती सूर्यवंशी यांनी केले प्रा. रघुनाथ गवळी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय केला तर आभार मा.बालेश राव थोरात  यांनी व्यक्त केले या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रा. अण्णासाहेब पाटील, महाविद्यालयातील एनएसएस विभागातील सर्व सदस्य व स्वयंसेवक, स्वयंसेविका उपस्थित होते.