Monday, September 22, 2025

महिलांनी स्वतःचे आरोग्य जपणे हीच यशस्वी संसाराची गुरुकिल्ली _____ डॉ. संचिता यादव.

 

महिलांनी स्वतःचे आरोग्य जपणे हीच यशस्वी संसाराची गुरुकिल्ली
 _____
डॉ. संचिता यादव.

A person standing in front of a screen

AI-generated content may be incorrect.

 

 श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे महिला सक्षमीकरण आणि लिंग समानता आणि अंतर्गत तक्रार निवारण समिती यांचे संयुक्त विद्यमाने घेतलेल्या उजळणी वर्गात "महिलांचे आरोग्य आणि पीसीओडी जनजागृती" या विषयावरती माऊली हॉस्पिटल कराड येथील डॉ. संचिता  यादव यांचे व्याख्यान संपन्न झाले. आपल्या मार्गदर्शनात त्या म्हणाल्या, महिलांनी स्वतःचे आरोग्य जपणे हिच यशस्वी संसाराच्या यशाची गुरुकिल्ली आहे!  आजच्या काळात मुली व महिला यामध्ये पीसीओडी चे प्रमाण वाढले आहे. त्याची कारणे काय आहेत व त्यावर ती उपचार काय घेतले पाहिजेत याबद्दल महिला जागृती हवी. यासाठी योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे. दररोजचा व्यायाम महिलांनी करावा. पीसीओडी मुळे वजन वाढणे, केस गळणे, चेहऱ्यावरती मुरूम येणे, गोड खावेसे वाटणे, काखेत, गळ्याला चट्टे पडणे, असा प्रादुर्भाव होतो. यासाठी संतुलित जीवनशैली जगता आली पाहिजे. शरीराला चुकीच्या सवयी लागल्या की शारीरिक बिघाड होऊन आत्मविश्वास निघून जातो. योग्य सल्ला न घेतल्यास किरकोळ आजार देखील मोठ्या आजारात रुपांतरीत होतो. आपले आरोग्य जरी चांगले असले तरी ते निरंतर जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, खऱ्या अर्थाने प्रपंचाचा गाडा हाकण्यास पुरुष व स्त्री ही दोन चाके आहेत. यातील एक चाक जरी नादुरुस्त झाले तर तो गाडा पुढे जाणार नाही. यासाठी महिलांनी आपले आरोग्य सुरक्षित ठेवले पाहिजे.

 या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या समुपदेशक सौ.धनश्री पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल सौ. सोनाली रांगोळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय ज्येष्ठ प्राध्यापक सचिन बोलाईकर यांनी केला. सूत्रसंचालन प्रा.शैला चोबे यांनी केले तर आभार डॉ.साऱीका लाटवडे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी जुनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा. सुरेश रजपूत उपस्थित होते. तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक,प्राध्यापिका बहुसंख्येने उपस्थित होते.

 

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यात संशोधक वृत्ती वाढवण्याचे प्रमुख साधन म्हणजे अविष्कार संशोधन स्पर्धा

 

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यात संशोधक वृत्ती वाढवण्याचे प्रमुख साधन म्हणजे अविष्कार संशोधन स्पर्धा.


 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यात संशोधक वृत्ती वाढवण्याचे प्रमुख साधन म्हणजे अविष्कार संशोधन स्पर्धा

____ प्रो. डॉ. उज्ज्वला ताठे

A group of people sitting at a desk in front of a chalkboard

AI-generated content may be incorrect.

 कराड - प्रतिनिधी.

 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे महाविद्यालयीन स्तरावरती अविष्कार संशोधन स्पर्धा 2025 /26 उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेचे प्रमुख परीक्षक व प्रमुख पाहुणे म्हणून प्रो.डॉ उज्वला ताठे इंग्रजी विभाग प्रमुख महिला महाविद्यालय कराड या होत्या. आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात त्या म्हणाल्या, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यात संशोधक वृत्ती वाढवण्याचे प्रमुख साधन म्हणजे अविष्कार स्पर्धा होय. या स्पर्धेत सहभागी होताना विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास असेल तर सादरीकरण उत्तम होते. . प्राथमिक व द्वितीयक माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांनी अचूक पुराव्यासह संशोधन प्रकल्प तयार केला पाहिजे.  आवश्यक आकडेवारी, नकाशे व सांख्यिक माहितीच्या आधारे पोस्टर शास्त्रीय पद्धतीने तयार करणे अपेक्षित असते. यासाठी विद्यार्थ्यांनी स्वय: अध्ययनावर भर दिला पाहिजे. विषय समजून घेऊन गृहीतकांची मांडणी करणे अपेक्षित आहे. लिहिलेल्या भागांमध्ये व्याकरणाचाही वापर असावा. आपण जे पोस्टर तयार केलेले असते ते अचूक पुराव्याच्या आधारे सादरीकरणाच्या वेळी स्पष्ट करता आले पाहिजे. 

                        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणालेअविष्कार स्पर्धेच्या निमित्ताने जसे विद्यार्थी तयार होतात तसेच प्राध्यापक ही तयार होतात. संशोधनाचे आकलन ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे कारण कोणताही जगातील देश संशोधनावरच उभा असतो. त्याची प्रगती होते. शिक्षणाचे अंतिम ध्येय विद्यार्थ्यांचे परिवर्तन आहे. विद्यार्थी सकारात्मक दृष्ट्या वैज्ञानिक पायावरती उभे असतील तर देशाला उज्वल दिवस आल्या वाचून राहणार नाहीत. यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करून स्वतःमधील संशोधक वृत्ती आपण जागी केली पाहिजे. आणि यातूनच राष्ट्र घडणार आहे.

               या अविष्कार स्पर्धेमध्ये भूगोल विभागाची विद्यार्थिनी प्रणाली जगदाळे हिचा प्रथम क्रमांक आला. तिला प्रा. दिपक गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. कुमारी वैष्णवी जाधव हिचा द्वितीय क्रमांक आला तिला अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मारुती सूर्यवंशी व सहकाऱी यांचे मार्गदर्शन लाभले. तृतीय क्रमांक वैभवी पाटील हिचा आला. तिला समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दादासाहेब घाडगे व सहकारी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच उत्तेजनार्थ क्रमांक सुहानी काळे इतिहास विभाग व राज्यशास्त्र विभागाची ऋणाली बुधे यांना देण्यात आले.तसेच कार्यक्रमात आलिजा मोमीन व प्रणाली जगदाळे यांनीही मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविष्कार संशोधन स्पर्धेचे समन्वयक डॉ. मारुती सूर्यवंशी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय स्वाती मोरकळ यांनी केला. आभार डॉ.आशा सावंत यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन डॉ. शितल गायकवाड यांनी केले. या स्पर्धेत महाविद्यालयातील सर्व विभागांनी सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक बंधू-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे उपयुक्त माध्यम म्हणजे हिंदी भाषा

 

राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे उपयुक्त माध्यम म्हणजे हिंदी भाषा.


 राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे उपयुक्त माध्यम म्हणजे हिंदी भाषा.

___डॉ. वैशाली शिंदे

A person standing at a podium

AI-generated content may be incorrect.

 कराड - प्रतिनिधी .

 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे हिंदी दिन समारोह उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कडेपुर. जिल्हा. सांगलीच्या डॉ. वैशाली शिंदे होत्या. त्या आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या, राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक देवाण-घेवाणीचे उपयुक्त माध्यम म्हणजे हिंदी भाषा आहे. भारतीय संविधानाने हिंदी ला राज भाषेचा दर्जा दिला आहे. हिंदी भाषेविषयी प्रत्येक व्यक्तीला आकर्षण आहे. कारण संपूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी ही भाषा आहे. स्वातंत्र्य काळात देशातील अनेक स्वातंत्र्यवीरांनी संपूर्ण देशभर हिंदी भाषेतच भाषणे केलेली होती . त्यामुळेच योग्य संदेश लोकांच्या पर्यंत पोहोचत होते. येणाऱ्या काळात हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार होऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

             कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे सर होते. आपल्या अध्यक्ष मार्गदर्शनात ते म्हणाले, हिंदी भाषा बोलायला साधी, सोपी व सरळ आहे. आपण ज्या वेळेस मातृभाषेत विचार करून तो विचार दुसऱ्या भाषेत व्यक्त करताना अडचणी येतात. परंतु ज्या भाषेत बोलायचे त्याच भाषेत विचार केला तर बोलणे सोपे होऊन जाते. विद्यार्थ्यांनी बहुभाषा शिकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण स्पर्धेच्या युगात पुढे जायचं असेल तर आपल्याला हिंदी सारखी भाषा, इंग्रजी सारखी भाषा शिकणे अनिवार्य आहे. हिंदी दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो!

                   हिंदी दिनाच्या निमित्ताने विद्यार्थिनी सिद्धी केंगार हिने मनोगत व्यक्त केले. प्राध्यापक प्रतिनिधी म्हणून भूगोल विभाग प्रमुख डॉ. सुभाष कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. हिंदी दिनाच्या निमित्ताने हिंदी विभागाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भित्तिपत्रिकेचे उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी प्राध्यापक प्राध्यापिका बहुसंख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्युनिअर विभागाचे प्रा. अण्णासाहेब पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.शितल गायकवाड यांनी केला.सूत्रसंचालन प्रा. सविता येवले यांनी केले तर आभार हिंदी विभाग प्रमुख प्रा. विश्वनाथ सुतार यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी  प्रा. रुपाली यादव यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.