Tuesday, December 13, 2022

पहिल्या महायुद्धात कराड परिसरातील सैनिक सहभागी, जुने दस्तऐवज सापडले! - इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर

पहिल्या महायुद्धात कराड परिसरातील सैनिक सहभागी, जुने दस्तऐवज सापडले! - इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर                     

कराड /प्रतिनिधी : 

        कराड आणि परिसराला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. पहिल्या महायुद्धात या परिसरातील तीनशे पेक्षा अधिक सैनिक सहभागी होते अशाप्रकारचे दस्तावेज नुकतेच सापडले आहेत. त्यामुळे कराड परिसरातील सैनिकांचा महायुद्धातील समावेश व त्यांनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेणे आता शक्य झाले आहे. याशिवाय साळुंखे महाविद्यालयाशी झालेल्या सामंजस्य करारामुळे आता आम्हाला स्थानिक इतिहासाचा अभ्यास करणे सहज सुलभ होईल. आमच्या अभ्यासाला गती येईल. सर्वंकष अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आम्ही विविध उपक्रम राबवणार आहोत. त्याद्वारे कराडच्या ऐतिहासिक वैभवला नक्कीच उजाळा मिळणार आहे असे प्रतिपादन मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष, इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर यांनी केले.                                        

       बापूजी साळुंखे महाविद्यालय येथे शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन व मिरज इतिहास संशोधन मंडळ यांच्याशी सामंजस्य करार प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड होते. तर प्रदर्शनाचे उद्घाटक कर्नल जे. पी. सत्तिगिरी, कर्नल दिनेश कुमार झा, प्रा. डॉ. सदाशिव पाटील व  प्रा. सचिन बोलाईकर आदी. होते.                              

        प्रदर्शनाचे उद्घाटक कर्नल जे. पी. सत्तिगिरी म्हणाले, इतिहासातून शिकण्याचा  प्रयत्न करा. इतिहासातील आदर्श प्रतिमांचे विचार अंगिकारण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुम्हाला प्रेरणा, ऊर्जा मिळेल. मात्र इतिहासाचा अभ्यास करताना इतिहासातील चुका विसरु नका कारण त्या विसरला तर परत त्याच चुका होण्याची शक्यता असते. त्याबाबतीत सतर्क रहा.                     

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाना   वरून बोलताना प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड म्हणाले, महाराष्ट्राला मोठा प्राचीन इतिहास आहे. या इतिहासाच्या पाऊलखुणा कृष्णा कोयना संगमावर असलेल्या डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या आवारात देखील आहेत. विशेषत: भुईकोट किल्ल्यात असणारी नकट्या रावळाची  विहीर,  त्याचबरोबर २००० वर्षांपूर्वीचे सातवाहनकालीन सापडलेल जातं,  विष्णू, कुबेर, शनीच्या मुर्त्या, तसेच जुन्या मंदिराचे अवशेष आहेत. ते यथायोग्य जतन करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.                       

       सदर प्रदर्शनात आद्यपूराश्मयुग, मोहेंजोदारो, हडप्पा, रावी, मध्यपुराश्मयुग तसेच सिंधू संस्कृतीचे पोस्टरच्या माध्यमातून तपशीलवार विवचन दिसून आले. याशिवाय इतिहासकालीन दिनदर्शिका, शिवकाली नाणी, जुनी चलने, शिवरायांची राजचिन्हे, मोडीतील विविध पत्रे तसेच मराठा कालीन विविध तलवारी, दुधार, युद्धफरशी, युद्धपट्टा, कट्यार, भाला, शिंगीभाला, जांबीया, फरशी आदी. शस्त्रास्त्रे सदर प्रदर्शनात शौर्याची साक्ष देत होती. त्यामुळे प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद मिळाला.          याप्रसंगी महाविद्यालयाचा इतिहास विभाग आणि मिरज इतिहास संशोधन मंडळ यांच्यात सामंजस्य करार झाला. त्याचबरोबर भितीपत्रिकेचे उद्घाटन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक चौगुले सर, प्रा. ए. बी. कणसे, अॅड. राम होगले यांच्यासहित विविध मान्यवर मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सचिन बोलाईकर, तर पाहुण्यांचा परिचय प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. शोभा लोहार यांनी तर आभार प्रा. विक्रांत सुपूगडे यांनी मानले. सदर प्रदर्शन यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा. युवराज कापसे, नारायण नाईक यांच्यासहित सर्व प्राध्यापक, सेवकवृंद, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.                  

फोटो कॅप्शन : 

    सामंजस्य करार प्रसंगी मार्गदर्शन करताना मानसिंगराव कुमठेकर सोबत कर्नल जे. पी. सत्तिगिरी, प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, प्रा. सचिन बोलाईकर.




इंडियन आर्मी जगातील सर्वोत्तम आर्मी आहे. - कर्नल जे. पी. सत्तिगिरी

इंडियन आर्मी जगातील सर्वोत्तम आर्मी आहे. - कर्नल जे. पी. सत्तिगिरी                           

कराड/प्रतिनिधी : 

    छात्रसेनेत (एनसीसी) विविध मूल्याधिष्ठित संस्कार छात्रसैनिकांमध्ये रुजविले जातात. विशेषत: शिस्त व देशप्रेमाचे धडे छात्रसैनिकांना त्यातून मिळत असतात. दरवर्षी देशभरातून अकरा लाख मुले एनसीसी मध्ये प्रवेशित होत असतात. त्यातूनच पुढे निवडक छात्रसैनिक पात्रता निकषाच्या आधारावर विविध पदांवर देशसेवेसाठी रुजू होत असतात. एकप्रकारे एनसीसी मधून सेवेत रुजू होणाऱ्या सुसंस्कारीत जवानांमुळेच इंडियन आर्मी आज जगातील सर्वोत्तम आर्मी बनली आहे असे प्रतिपादन १९ महाराष्ट्र बटालियन कराडचे कमांडींग ऑफिसर कर्नल जे.पी. सत्तिगिरी यांनी केले. बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे राष्ट्रीय छात्रसेना उद्घाटन समारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड होते. तर प्रमुख उपस्थितीत अॅडम ऑफिसर कर्नल दिनेश कुमार झा होते.                         

        कर्नल सत्तिगिरी पुढे म्हणाले, देश वेगाने महासत्ता बनण्याच्या दिशेने चालला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात खूप मोठ्या संधी आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखल्या पाहिजेत. छत्रपती शिवरायांना अपेक्षित असणारा मावळा म्हणूनच तुम्हाला देशसेवेत रुजू व्हायचे आहे. त्या दृष्टिकोनातून तयारीला लागा असेही ते म्हणाले.              

          कर्नल दिनेश कुमार झा म्हणाले, बापूजी साळुंखे यांनी खूप प्रयासाने ही शिक्षण संकुले उभे केली आहेत. त्यांच्या संघर्षाची जाण ठेवा आणि शिक्षणावरच लक्ष केंद्रित करा. विशेषतः एनसीसी च्या माध्यमातून शिस्तीचे पालन करा. आयुष्यभर शिस्त तुम्हाला सुखकर जीवन जगायला मदत करेल. खऱ्या अर्थाने सुदृढ समाज बांधणीमध्ये एनसीसीचे महत्त्व अधोरेखीत  होते ही बाब जाणून घ्या.                       कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड म्हणाले एनसीसी खऱ्या अर्थाने छात्रसैनिकांमध्ये देश प्रेमाचे स्फूल्लिंग चेतवते. छात्रसैनिकाला सैनिकी पेशापर्यंत घेऊन जाणारा  एनसीसी हा एक महत्त्वाचा दुवा आहे. छात्रसैनिक कालावधीनंतर छात्रसैनिकाची वर्दी, कॅप जरी उतरली तरी त्या विद्यार्थ्यांच्या मनात कायम वर्दी राहते, देशप्रेम राहते, शिस्त राहते.                 

          कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एनसीसी तसेच राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) च्या शिस्त व सेवेचा संस्कार सांगणाऱ्या प्रतीकात्मक फलकांचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवकालीन शस्त्रास्त्रे व विविध शिवकालीन वस्तूंचे देखील प्रदर्शन भरवण्यात आले होते.                            एनसीसी उद्घाटन समारंभास वेणूताई चव्हाण महाविद्यालय, संत गाडगेबाबा महाविद्यालय, कृष्णा महाविद्यालय रेठरे तसेच आहेर इंजीनियरिंग कॉलेजचे छात्र सैनिक मोठ्या संख्येने हजर होते. त्याचबरोबर सुभेदार संजय कुमार, एनसीसी ऑफिसर प्रा. गावडे, प्रा. देसाई, प्रा.माळी, प्रा. ठाकरे, प्रा. अवसरे, प्रा. ऐश्वर्या मॅडम आदी. उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सचिन बोलाईकर तर पाहुण्यांच्या परिचय प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. शोभा लोहार यांनी तर आभार प्रा. विक्रांत सुपुगडे  यांनी मानले.         

फोटो कॅप्शन : 

    एन.सी.सी उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना कर्नल जे.पी. सत्तिगिरी, कर्नल दिनेश कुमार झा, प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, मा. मानसिंगराव कुमठेकर, प्रा. सचिन बोलाईकर










बापूजी साळुंखे महाविद्यालयाचा शुभम जाधव 'अश्वमेध' क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी

बापूजी साळुंखे महाविद्यालयाचा शुभम जाधव 'अश्वमेध' क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी               

कराड/ प्रतिनिधी : 

      श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कराड येथील शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचा खेळाडू शुभम रामचंद्र जाधव बी.ए भाग २ याने राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ स्पर्धा 'अश्वमेध' मधे शिवाजी विद्यापीठाकडून खेळताना 'भालाफेक' या क्रीडा प्रकारात नेत्रदीपक कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. महाराष्ट्र राज्य स्तरावर होणाऱ्या 'अश्वमेध' स्पर्धेतील त्याच्या कामगिरीने शिवाजी विद्यापीठाबरोबरच श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था व बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली आहे.                                    

              महाराष्ट्र राज्यस्तरीय अश्वमेध आंतर विद्यापीठ स्पर्धा नुकत्याच औरंगाबाद येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाकडून खेळताना शुभम जाधव याने अमरावती विद्यापीठाच्या शुभम इंगोले (५८.४७ मीटर) याला मात देत सुवर्णपदकाला गवसणी घातली. शुभम जाधव याने ६५.८२ मीटर भालाफेक करत सुवर्णवेध साधला.          

        त्याच्या या दैदीप्यमान यशाबद्दल श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगीताई गावडे, प्रशासन सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, अर्थ सहसचिव सिताराम गवळी, संस्था सी.ई.ओ कौस्तुभ गावडे तसेच महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी त्याचे अभिनंदन केले. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. देवदत्त महात्मे, प्रा. गौरव पाटील यांनी या खेळाडूस मार्गदर्शन केले.    बापूजी साळुंखे महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधा केलेली आर्थिक मदत तसेच प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास यामुळेच मी हे यश मिळवू शकलो अशा भावना या खेळाडूने व्यक्त केल्या. या खेळाडूवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.                          

फोटो कॅप्शन : 

        शुभम जाधव यांचे अभिनंदन करताना प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड सोबत प्रा. देवदत्त महात्मे आणि इतर.









बापूजी साळुंखे महाविद्यालयात दुर्मिळ शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन आणि एन.सी.सी. उद्घाटन

बापूजी साळुंखे महाविद्यालयात दुर्मिळ शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन आणि एन.सी.सी. उद्घाटन              

कराड/प्रतिनिधी: 

          विलक्षण प्रतिभेचे तेज, लोककल्याणाची तळमळ, परधर्माबाबत असणारी  कमालीची सहिष्णुता यामुळेच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आजही जनसामान्यांना तितकेच प्रिय, वंदनीय आहेत. आजही छत्रपती शिवाजी महाराज यांनी घालून दिलेले राजनीतीचे दंडक व विचार यातून ते अमर आहेत व शेकडो वर्ष अमर राहतील. त्यांच्या प्रती कृतज्ञता दर्शवण्यासाठी तसेच समाजापर्यंत त्यांचे विचार पोचविण्यासाठी गुरुवार, दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत शिक्षण  महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे शिवकालीन शस्त्रास्त्रे व दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे त्याचबरोबर राष्ट्रीय छात्रसेना उद्घाटन समारंभ असल्याची माहिती देखील प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माध्यमांना दिली आहे.            

        इतिहास विभाग व राष्ट्रीय छात्रसेना विभागाच्या वतीने आयोजित या प्रदर्शनात ऐतिहासिक शस्त्रास्त्रे तलवार, वाघनखे, दांडपट्टा, कट्यार, भाला, जांबिया, बिछवा, सुरई, ऐतिहासिक दस्तावेज, मोडी कागदपत्रे, शिवकालीन ग्रामव्यवस्था प्रतिकृती, शिवकालीन नाणी तसेच घरगुती परिमाणे, मनोरंजनाची साधने अशा स्वरूपात हे प्रदर्शन भरणार आहे. हे प्रदर्शन शिवरायांच्या शौर्याची साक्ष देईल. तसेच आजच्या पिढीला आपल्या पूर्वजांच्या थोर वारस्याची ओळख होईल व त्यांचे विचार अंगीकृत करण्यासाठी प्रेरणा मिळेल हा प्रदर्शन ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश आहे.                         

            या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. कर्नल जे. पी. सत्तिगिरी तसेच मा. कर्नल दिनेशकुमार झा, अॅडम ऑफिसर १९ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी, कराड  यांचे हस्ते होणार आहे. यावेळी मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष मानसिंगराव कुमठेकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. दरम्यान इतिहास संशोधन मंडळ, मिरज आणि  महाविद्यालयाचा इतिहास विभाग यांच्यात सामंजस्य करार होणार आहे. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, इतिहासप्रेमी, शिवप्रेमी तसेच समस्त नागरिकांना या नाविन्यपूर्ण, ऐतिहासिक प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी केले आहे. इतिहास विभागप्रमुख प्रा. सचिन बोलाईकर, प्रा. सुरेश रजपूत यांचे सहित महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सेवकवृंद कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.                    

फोटो कॅप्शन : 

        प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड.









Tuesday, December 6, 2022

एन.सी.सी. उद्घाटन

एन.सी.सी. उद्घाटन              

कराड/प्रतिनिधी : 

            विलक्षण प्रतिभेचे तेज, लोककल्याणाची तळमळ, परधर्माबाबत असणारी  कमालीची सहिष्णुता यामुळेच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आजही जनसामान्यांना तितकेच प्रिय, वंदनीय आहेत. आजही छत्रपती शिवाजी महाराज यांनी घालून दिलेले राजनीतीचे दंडक व विचार यातून ते अमर आहेत व शेकडो वर्ष अमर राहतील. त्यांच्या प्रती कृतज्ञता दर्शवण्यासाठी तसेच समाजापर्यंत त्यांचे विचार पोचविण्यासाठी गुरुवार, दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत शिक्षण  महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे शिवकालीन शस्त्रास्त्रे व दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे त्याचबरोबर राष्ट्रीय छात्रसेना उद्घाटन समारंभ असल्याची माहिती देखील प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माध्यमांना दिली आहे. 

            इतिहास विभाग व राष्ट्रीय छात्रसेना विभागाच्या वतीने आयोजित या प्रदर्शनात ऐतिहासिक शस्त्रास्त्रे तलवार, वाघनखे, दांडपट्टा, कट्यार, भाला, जांबिया, बिछवा, सुरई, ऐतिहासिक दस्तावेज, मोडी कागदपत्रे, शिवकालीन ग्रामव्यवस्था प्रतिकृती, शिवकालीन नाणी तसेच घरगुती परिमाणे, मनोरंजनाची साधने अशा स्वरूपात हे प्रदर्शन भरणार आहे. हे प्रदर्शन शिवरायांच्या शौर्याची साक्ष देईल. तसेच आजच्या पिढीला आपल्या पूर्वजांच्या थोर वारस्याची ओळख होईल व त्यांचे विचार अंगीकृत करण्यासाठी प्रेरणा मिळेल हा प्रदर्शन ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश आहे.                  

            या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. कर्नल जे. पी. सत्तिगिरी तसेच मा. कर्नल दिनेशकुमार झा,  ऑफिसर १९ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी, कराड  यांचे हस्ते होणार आहे. यावेळी मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष मानसिंगराव कुमठेकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. दरम्यान इतिहास संशोधन मंडळ, मिरज आणि  महाविद्यालयाचा इतिहास विभाग यांच्यात सामंजस्य करार होणार आहे. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, इतिहासप्रेमी, शिवप्रेमी तसेच समस्त नागरिकांना या नाविन्यपूर्ण, ऐतिहासिक प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी केले आहे. इतिहास विभागप्रमुख प्रा. सचिन बोलाईकर, प्रा. सुरेश रजपूत यांचे सहित महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सेवकवृंद कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.      

Friday, December 2, 2022

१ डिसेंबर जागतिक एडस दिन निमित्त शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत जागतिक एडस दिन साजरा

 

१ डिसेंबर जागतिक एडस दिन निमित्त शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत जागतिक एडस दिन साजरा

१ डिसेंबर जागतिक एडस दिन निमित्त शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत जागतिक एडस दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश गायकवाड सर यांनी जागतिक एडस दिन या दिवसाचे महत्व विद्यार्थ्यांसमोर मांडले. जागतिक एडस दिन सुरू होण्यामागे अत्यंत मार्मिक शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक श्री सचिन बोलाईकर सर यांनी शपथ वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुभाष कांबळे सर तर कार्यक्रमाचे आभार ज्युनिअर विभागाचे अण्णासाहेब पाटील यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, ज्युनिअर व सीनियर विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.






कराड तालुका शालेय कबड्डी स्पर्धा : शिवनगर आणि एस.जी.एम ची बाजी

कराड तालुका शालेय कबड्डी स्पर्धा : शिवनगर आणि एस.जी.एम ची बाजी                  

कराड/प्रतिनिधी: 

        यश आणि अपयश याशिवाय खेळ पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळे यश मिळाले तरी नम्र रहा आणि अपयश मिळाले तरी खचू नका. खेळाच्या माध्यमातून शरीर आणि मन सुदृढ ठेवा त्याचा फायदा पुढे आयुष्य जगताना नक्कीच होईल. अपयशात कोणाचा द्वेष, मत्सर करू नका तर अधिक जोमाने पुढील तयारीला लागा. फक्त खेळ जिंकला पाहिजे. खिलाडूवृत्ती जिंकली पाहिजे ही भावना मनात ठेवा असे प्रतिपादन प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी केले.                             

      कराड तालुका शालेय कबड्डी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रमुख उपस्थितीत प्रा. सुरेश रजपूत, प्रा. सुरेश यादव, प्रा. महेश लोहार आदी होते.

     कराड तालुका शालेय शासकीय १९ वर्षाखालील कबड्डी स्पर्धा नुकत्याच विंग हायस्कूल येथे संपन्न झाल्या. तर स्पर्धेतील अंतिम सामना एस.जी.एम कॉलेज, कराड  च्या क्रीडांगणावर पार पडला. शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात कृष्णा महाविद्यालय शिवनगर ता. कराड मुलांच्या संघाने ७ गुणांनी एस.जी.एम कॉलेज, कराड वर मात करत विजयी जल्लोष केला. तर एस.जी.एम कॉलेजच्या मुलींच्या संघाने वाय.सी. कॉलेज, कराड च्या संघाला २५ गुणांनी धोबीपछाड दिली. या स्पर्धेसाठी मुलांचे ११ संघ तर मुलींचे ६ संघ सहभागी झाले होते. विजेते संघ छत्रपती शाहू क्रीडा संकुल, सातारा येथे ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या सातारा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. स्पर्धेसाठी पंच म्हणून आयुब कच्छी, अभिषेक पाटील, सचिन चव्हाण, अजीम इनामदार, दिग्विजय पाटील, विद्या पाटील आदींनी काम पाहिले. तर प्रा. गौरव पाटील, प्रा. देवदत्त महात्मे, प्रा. विक्रांत सुपगडे यांनी सर्वतोपरी नियोजन करून स्पर्धा यशस्वी पार पाडल्या.                      

    यावर्षी शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड कडे यजमानपद होते. साळुंखे महाविद्यालयाच्या शिस्तबद्ध नियोजनाबाबत प्राचार्य डॉ. मोहन राजमाने सरांनी यजमान महाविद्यालयाचे अभिनंदन केले.              

फोटो कॅप्शन : 

    कृष्णा महाविद्यालय शिवनगर ता. कराड मुलांचा विजयी संघ प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांच्याकडून चषक स्वीकारताना.