Thursday, August 21, 2025

"बी.ए.भाग एक व बी.कॉम. भाग एक विद्यार्थ्यांच्या साठी सांस्कृतिक विभागाच्या वतीने नवागतांचे स्वागत समारंभ संपन्न २०२५-२६"

 कराड - प्रतिनिधी.

श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे बी.ए.भाग एक व बी.कॉम. भाग एक विद्यार्थ्यांच्या साठी सांस्कृतिक विभागाच्या वतीने नवागतांचे स्वागत समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.सतीश घाटगे होते.आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, महाविद्यालयीन शिक्षणामुळे विद्यार्थी ज्ञानात्मक, क्रियात्मक व भावात्मक पातळीवर यशस्वी होतो. महाविद्यालयीन शिक्षण ही घरात बसून शिकण्याची प्रक्रिया नाही. वर्गात प्रत्यक्ष बसून घेतलेले शिक्षण हे विद्यार्थी जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे. महाविद्यालयात विविध उपक्रम साजरे केले जातात. विविध विषयांचे ज्ञान मिळते. ज्ञानातून माणूस क्रियाशील बनतो व सुसंस्कारित विचाराने तो भावात्मक दृष्ट्या उत्तम तयार होत असतो. गुरुजनांचे दररोजच्या व्याख्यानातून अध्यापनातून विद्यार्थ्यांच्यावर सुसंस्कार होतात. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी प्रत्येक तास प्रत्येक कार्यक्रम हा विद्यार्थ्यांच्या साठी महत्त्वाचा असतो. राष्ट्रीय सेवा योजना असेल, एनसीसी असेल, विविध स्पर्धा, विविध परीक्षा, आविष्कार संशोधन सारख्या विद्यापीठ स्तरीय स्पर्धा, विविध खेळांच्या स्पर्धा अशा अनेक उपक्रमातून विद्यार्थी घडण्यास मदत होते. यासाठी विद्यार्थ्यांनी नियमितपणे महाविद्यालयात येणे आवश्यक आहे.

                        आपल्या मार्गदर्शनात सर पुढे म्हणाले आपण सर्व बी.ए व बी.कॉम भाग एकचे विद्यार्थी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी निर्माण केलेल्या सुसंस्कार केंद्रात प्रवेश घेतलेला आहे. नक्कीच बापूजींची ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या त्रिसूत्रीतून आपले महाविद्यालय चालते. त्यामुळे या महाविद्यालयात प्रवेश घेतल्याने आपले भविष्य उज्वल आहे. कारण महाविद्यालयाच्या इतिहासात आपले अनेक विद्यार्थी उच्च विद्या विभूषित होऊन अनेक चांगल्या पदावरती कार्यरत आहेत. अनेक खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेले आहेत. नक्कीच हा वारसा आपण सर्वजण पुढे चालवूया. आपल्या सर्वांना आपल्या शैक्षणिक भविष्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो!

                              या कार्यक्रमात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मा. प्राचार्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. सदर स्वागत समारंभात डॉ.मारुती सूर्यवंशी, प्रा.विश्वनाथ सुतार, डॉ. आशा सावंत, विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी जाधव, यांनी आपले मनोगत व्यक्त केल. या कार्यक्रमासाठी प्रा. रत्नाकर कोळी ज्येष्ठ प्रा. सचिन बोलाईकर व सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सुभाष कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. स्वाती मोरकळ व डॉ. सारिका लाटवडे यांनी केले तर आभार प्रा. ज्योती धर्माधिकारी व्यक्त केले.



No comments:

Post a Comment

Thanks for reply