Thursday, August 21, 2025

"79 वा स्वातंत्र्य दिन महाविद्यालयात साजरा"

 

हुतात्म्यांच्या बलिदानातून देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य.

__________मास्टर सय्यद हुसेन

 

कराड - प्रतिनिधी

            15 ऑगस्ट 2025 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. ध्वजारोहणाचे प्रमुख अतिथी सन्माननीय मास्टर सय्यद हुसेन होते. त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देताना ते म्हणाले, हुतात्म्यांच्या बलिदानातून देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे. आज आपण सर्व नागरिक देशभर उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारताला स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारक अनेक समाजसुधारक व सर्वसामान्य जनतेने ब्रिटिशांच्या विरोधात लढा दिला व स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी तुरुंगवास सोसला. अनेक स्वातंत्र्यवीर शहीद झाले. भगतसिंग,सुखदेव, राजगुरू, बाबू गेणू इत्यादी हजारो तरुणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तर महात्मा गांधी लोकमान्य टिळक इत्यादी समाजसुधारकांनी ब्रिटिशाविरुद्ध लढा दिला. यामध्ये सर्वसामान्य जनतेचे मोठे योगदान आहे. त्यामुळे स्वातंत्र्याची जपणूक करणे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो!

             स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयात माननीय प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे सर यांच्या अध्यक्षतेखाली देशभक्तीपर गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम साजरा झाला. यामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी यांनी सहभाग घेतला. तसेच प्रीतीसंगम हास्य परिवार कराड चे सदस्य सहभागी झाले. कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.

                    या स्वातंत्र्य दिनासाठी कराड व कराड परिसरातून अनेक नागरिक बंधू-भगिनी सहभागी झाले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील विविध शाखातून आलेले आजी-माजी प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख सुरेश यादव एनसीसी प्रमुख प्रा.दीपक गुरव सीनियर विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सुभाष कांबळे, ज्येष्ठ प्राध्यापक सचिन बोलाईकर, ज्युनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्राध्यापक सुरेश रजपूत, सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसी कॅडेट व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Thanks for reply