Thursday, August 21, 2025

"बी.ए.भाग एक व बी.कॉम. भाग एक विद्यार्थ्यांच्या साठी सांस्कृतिक विभागाच्या वतीने नवागतांचे स्वागत समारंभ संपन्न २०२५-२६"

 कराड - प्रतिनिधी.

श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे बी.ए.भाग एक व बी.कॉम. भाग एक विद्यार्थ्यांच्या साठी सांस्कृतिक विभागाच्या वतीने नवागतांचे स्वागत समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.सतीश घाटगे होते.आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, महाविद्यालयीन शिक्षणामुळे विद्यार्थी ज्ञानात्मक, क्रियात्मक व भावात्मक पातळीवर यशस्वी होतो. महाविद्यालयीन शिक्षण ही घरात बसून शिकण्याची प्रक्रिया नाही. वर्गात प्रत्यक्ष बसून घेतलेले शिक्षण हे विद्यार्थी जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे. महाविद्यालयात विविध उपक्रम साजरे केले जातात. विविध विषयांचे ज्ञान मिळते. ज्ञानातून माणूस क्रियाशील बनतो व सुसंस्कारित विचाराने तो भावात्मक दृष्ट्या उत्तम तयार होत असतो. गुरुजनांचे दररोजच्या व्याख्यानातून अध्यापनातून विद्यार्थ्यांच्यावर सुसंस्कार होतात. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी प्रत्येक तास प्रत्येक कार्यक्रम हा विद्यार्थ्यांच्या साठी महत्त्वाचा असतो. राष्ट्रीय सेवा योजना असेल, एनसीसी असेल, विविध स्पर्धा, विविध परीक्षा, आविष्कार संशोधन सारख्या विद्यापीठ स्तरीय स्पर्धा, विविध खेळांच्या स्पर्धा अशा अनेक उपक्रमातून विद्यार्थी घडण्यास मदत होते. यासाठी विद्यार्थ्यांनी नियमितपणे महाविद्यालयात येणे आवश्यक आहे.

                        आपल्या मार्गदर्शनात सर पुढे म्हणाले आपण सर्व बी.ए व बी.कॉम भाग एकचे विद्यार्थी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी निर्माण केलेल्या सुसंस्कार केंद्रात प्रवेश घेतलेला आहे. नक्कीच बापूजींची ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या त्रिसूत्रीतून आपले महाविद्यालय चालते. त्यामुळे या महाविद्यालयात प्रवेश घेतल्याने आपले भविष्य उज्वल आहे. कारण महाविद्यालयाच्या इतिहासात आपले अनेक विद्यार्थी उच्च विद्या विभूषित होऊन अनेक चांगल्या पदावरती कार्यरत आहेत. अनेक खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेले आहेत. नक्कीच हा वारसा आपण सर्वजण पुढे चालवूया. आपल्या सर्वांना आपल्या शैक्षणिक भविष्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो!

                              या कार्यक्रमात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मा. प्राचार्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. सदर स्वागत समारंभात डॉ.मारुती सूर्यवंशी, प्रा.विश्वनाथ सुतार, डॉ. आशा सावंत, विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी जाधव, यांनी आपले मनोगत व्यक्त केल. या कार्यक्रमासाठी प्रा. रत्नाकर कोळी ज्येष्ठ प्रा. सचिन बोलाईकर व सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सुभाष कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. स्वाती मोरकळ व डॉ. सारिका लाटवडे यांनी केले तर आभार प्रा. ज्योती धर्माधिकारी व्यक्त केले.



"79 वा स्वातंत्र्य दिन महाविद्यालयात साजरा"

 

हुतात्म्यांच्या बलिदानातून देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य.

__________मास्टर सय्यद हुसेन

 

कराड - प्रतिनिधी

            15 ऑगस्ट 2025 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. ध्वजारोहणाचे प्रमुख अतिथी सन्माननीय मास्टर सय्यद हुसेन होते. त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देताना ते म्हणाले, हुतात्म्यांच्या बलिदानातून देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे. आज आपण सर्व नागरिक देशभर उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारताला स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारक अनेक समाजसुधारक व सर्वसामान्य जनतेने ब्रिटिशांच्या विरोधात लढा दिला व स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी तुरुंगवास सोसला. अनेक स्वातंत्र्यवीर शहीद झाले. भगतसिंग,सुखदेव, राजगुरू, बाबू गेणू इत्यादी हजारो तरुणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तर महात्मा गांधी लोकमान्य टिळक इत्यादी समाजसुधारकांनी ब्रिटिशाविरुद्ध लढा दिला. यामध्ये सर्वसामान्य जनतेचे मोठे योगदान आहे. त्यामुळे स्वातंत्र्याची जपणूक करणे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो!

             स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयात माननीय प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे सर यांच्या अध्यक्षतेखाली देशभक्तीपर गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम साजरा झाला. यामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी यांनी सहभाग घेतला. तसेच प्रीतीसंगम हास्य परिवार कराड चे सदस्य सहभागी झाले. कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.

                    या स्वातंत्र्य दिनासाठी कराड व कराड परिसरातून अनेक नागरिक बंधू-भगिनी सहभागी झाले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील विविध शाखातून आलेले आजी-माजी प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख सुरेश यादव एनसीसी प्रमुख प्रा.दीपक गुरव सीनियर विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सुभाष कांबळे, ज्येष्ठ प्राध्यापक सचिन बोलाईकर, ज्युनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्राध्यापक सुरेश रजपूत, सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसी कॅडेट व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.


"प्रधानमंत्री जन आरोग्य योजना -आयुष्यमान भारत"

 कराड - प्रतिनिधी. 

            श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे 19 महाराष्ट्र बटालियन कराड एनसीसी विभाग यांचे वतीने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना -आयुष्यमान भारत याविषयीचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.अशोक यादव होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजे- आयुष्यमान भारत म्हणजे देशातील गोरगरीब नागरिकांची संजीवनी होय. भारत सरकारने निर्माण केलेल्या या योजनेत कोट्यावधी लोक सहभागी आहेत. लोकांच्या आरोग्याची काळजी घेताना या योजनेने रुपये पाच लाखापर्यंत चे अनुदान नागरिकांच्या साठी दिलेले आहे. आज आरोग्याचा प्रश्नांचा विचार केला तर गोरगरीब माणसांना आर्थिक परिस्थिती अभावी दवाखान्याचा खर्च परवडत नाही. पैशाअभावी अनेकांचे आरोग्य धोक्यात येते. परंतु या योजनेत सहभागी झाल्यामुळे रुपये पाच लाखापर्यंत चा मोठा खर्च शासन करते. त्यामुळे पात्र असलेल्या नागरिकांनी या योजनेत सहभागी होऊन आपले आरोग्य जपले पाहिजे. आज एनसीसी विभागाच्या वतीने हा कार्यक्रम होत आहे समाजात जे लोक या योजनेपासून वंचित आहेत या सर्वांना एनसीसीतील विद्यार्थ्यांनी सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो!

                कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे सर होते आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, प्रमुख पाहुण्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार एनसीसीतील प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या अवतीभवती समाजातील अशिक्षित, पीडित, वंचित नागरिकांसाठी या योजनेचे साक्षरता अभियान राबवून लोकांना या योजने संबंधीची सर्व माहिती द्यावी. त्यामुळे आपल्या सर्वांच्या हातून एक अत्यंत महत्त्वपूर्ण सामाजिक कार्य घडेल. अशी मी अशा व्यक्त करतो.

            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय एनसीसी विभागप्रमुख प्रा. दीपक गुरव यांनी केला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, एनसीसी कॅडेट, तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सविता येवले यांनी केले तर आभार प्रा. रत्नाकर कोळी यांनी व्यक्त केले. 



Comments


Comments


" ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती"

 कराड - प्रतिनिधी. 


             श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती ग्रंथालय विभागाच्या वतीने उत्साहात साजरी झाली.ग्रंथांचे प्रदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.सतीश घाटगे होते, यावेळी बोलताना कार्यक्रमाचे पाहुणे म्हणाले की ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे व्यक्तिमत्व म्हणजे विद्यार्थी वाचकांचे प्रेरणास्थान! रंगनाथन हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व होते. एक गणिताचे अभ्यासक असून देखील ग्रंथालय चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. ग्रंथालय अभ्यासासाठी ते लंडनला गेले व परत आल्यानंतर ग्रंथालय क्षेत्रात त्यांनी उत्तुंग कामगिरी केली. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या महाविद्यालयाने दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित केले. ही अतिशय स्तुत्य बाब आहे. असे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या समोर सतत होत राहिले तर मुलांची वाचन क्षमता व वाचनाची आवड वाढेल. वाचनातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. त्यामुळे आपल्या ग्रंथालयातील हजारो पुस्तकांचा लाभ विद्यार्थ्यांनी सतत घेतला पाहिजे.

            आपल्या मार्गदर्शनात प्रमुख पाहुणे पुढे म्हणाले, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी शिक्षणात मोलाचे योगदान दिले आहे. आपल्या ग्रंथालयात बापूजींचे विचार प्रकट करणारी अनेक पुस्तके आहेत. ती विद्यार्थ्यांनी वाचावीत बापूजी कसे घडले हे आपल्याला समजेल व आपलेही विचार त्यांच्या जीवनशैली प्रमाणे बनण्यास मदत होईल. या ग्रंथालय प्रदर्शनाला मी शुभेच्छा देतो!


            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल सोनाली रांगोळे यांनी केले. आभार जेष्ठ प्राध्यापक सचिन बोलाईकर, यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे  गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.रत्नाकर कोळी , प्रा. विश्वनाथ सुतार डॉ.मारुती सूर्यवंशी, एन.सी.सी प्रमुख प्रा. दीपक गुरव,  ज्युनिअर विभागातील प्रा. सुरेश रजपूत प्रा. अण्णासाहेब पाटील, प्रा. रानडे मॅडम व इतर प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी होण्यामध्ये श्रीमती वैशाली सेन व अमृता डवरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.