कराड - प्रतिनिधी.
श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती ग्रंथालय विभागाच्या वतीने उत्साहात साजरी झाली.ग्रंथांचे प्रदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.सतीश घाटगे होते, यावेळी बोलताना कार्यक्रमाचे पाहुणे म्हणाले की ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे व्यक्तिमत्व म्हणजे विद्यार्थी वाचकांचे प्रेरणास्थान! रंगनाथन हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व होते. एक गणिताचे अभ्यासक असून देखील ग्रंथालय चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. ग्रंथालय अभ्यासासाठी ते लंडनला गेले व परत आल्यानंतर ग्रंथालय क्षेत्रात त्यांनी उत्तुंग कामगिरी केली. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या महाविद्यालयाने दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित केले. ही अतिशय स्तुत्य बाब आहे. असे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या समोर सतत होत राहिले तर मुलांची वाचन क्षमता व वाचनाची आवड वाढेल. वाचनातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. त्यामुळे आपल्या ग्रंथालयातील हजारो पुस्तकांचा लाभ विद्यार्थ्यांनी सतत घेतला पाहिजे.
आपल्या मार्गदर्शनात प्रमुख पाहुणे पुढे म्हणाले, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी शिक्षणात मोलाचे योगदान दिले आहे. आपल्या ग्रंथालयात बापूजींचे विचार प्रकट करणारी अनेक पुस्तके आहेत. ती विद्यार्थ्यांनी वाचावीत बापूजी कसे घडले हे आपल्याला समजेल व आपलेही विचार त्यांच्या जीवनशैली प्रमाणे बनण्यास मदत होईल. या ग्रंथालय प्रदर्शनाला मी शुभेच्छा देतो!
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल सोनाली रांगोळे यांनी केले. आभार जेष्ठ प्राध्यापक सचिन बोलाईकर, यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.रत्नाकर कोळी , प्रा. विश्वनाथ सुतार डॉ.मारुती सूर्यवंशी, एन.सी.सी प्रमुख प्रा. दीपक गुरव, ज्युनिअर विभागातील प्रा. सुरेश रजपूत प्रा. अण्णासाहेब पाटील, प्रा. रानडे मॅडम व इतर प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी होण्यामध्ये श्रीमती वैशाली सेन व अमृता डवरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment
Thanks for reply