Tuesday, December 13, 2022

बापूजी साळुंखे महाविद्यालयाचा शुभम जाधव 'अश्वमेध' क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी

बापूजी साळुंखे महाविद्यालयाचा शुभम जाधव 'अश्वमेध' क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी               

कराड/ प्रतिनिधी : 

      श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कराड येथील शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचा खेळाडू शुभम रामचंद्र जाधव बी.ए भाग २ याने राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ स्पर्धा 'अश्वमेध' मधे शिवाजी विद्यापीठाकडून खेळताना 'भालाफेक' या क्रीडा प्रकारात नेत्रदीपक कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. महाराष्ट्र राज्य स्तरावर होणाऱ्या 'अश्वमेध' स्पर्धेतील त्याच्या कामगिरीने शिवाजी विद्यापीठाबरोबरच श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था व बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली आहे.                                    

              महाराष्ट्र राज्यस्तरीय अश्वमेध आंतर विद्यापीठ स्पर्धा नुकत्याच औरंगाबाद येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाकडून खेळताना शुभम जाधव याने अमरावती विद्यापीठाच्या शुभम इंगोले (५८.४७ मीटर) याला मात देत सुवर्णपदकाला गवसणी घातली. शुभम जाधव याने ६५.८२ मीटर भालाफेक करत सुवर्णवेध साधला.          

        त्याच्या या दैदीप्यमान यशाबद्दल श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगीताई गावडे, प्रशासन सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, अर्थ सहसचिव सिताराम गवळी, संस्था सी.ई.ओ कौस्तुभ गावडे तसेच महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी त्याचे अभिनंदन केले. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. देवदत्त महात्मे, प्रा. गौरव पाटील यांनी या खेळाडूस मार्गदर्शन केले.    बापूजी साळुंखे महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधा केलेली आर्थिक मदत तसेच प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास यामुळेच मी हे यश मिळवू शकलो अशा भावना या खेळाडूने व्यक्त केल्या. या खेळाडूवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.                          

फोटो कॅप्शन : 

        शुभम जाधव यांचे अभिनंदन करताना प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड सोबत प्रा. देवदत्त महात्मे आणि इतर.









No comments:

Post a Comment

Thanks for reply