Tuesday, December 13, 2022

बापूजी साळुंखे महाविद्यालयात दुर्मिळ शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन आणि एन.सी.सी. उद्घाटन

बापूजी साळुंखे महाविद्यालयात दुर्मिळ शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन आणि एन.सी.सी. उद्घाटन              

कराड/प्रतिनिधी: 

          विलक्षण प्रतिभेचे तेज, लोककल्याणाची तळमळ, परधर्माबाबत असणारी  कमालीची सहिष्णुता यामुळेच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आजही जनसामान्यांना तितकेच प्रिय, वंदनीय आहेत. आजही छत्रपती शिवाजी महाराज यांनी घालून दिलेले राजनीतीचे दंडक व विचार यातून ते अमर आहेत व शेकडो वर्ष अमर राहतील. त्यांच्या प्रती कृतज्ञता दर्शवण्यासाठी तसेच समाजापर्यंत त्यांचे विचार पोचविण्यासाठी गुरुवार, दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत शिक्षण  महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे शिवकालीन शस्त्रास्त्रे व दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे त्याचबरोबर राष्ट्रीय छात्रसेना उद्घाटन समारंभ असल्याची माहिती देखील प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माध्यमांना दिली आहे.            

        इतिहास विभाग व राष्ट्रीय छात्रसेना विभागाच्या वतीने आयोजित या प्रदर्शनात ऐतिहासिक शस्त्रास्त्रे तलवार, वाघनखे, दांडपट्टा, कट्यार, भाला, जांबिया, बिछवा, सुरई, ऐतिहासिक दस्तावेज, मोडी कागदपत्रे, शिवकालीन ग्रामव्यवस्था प्रतिकृती, शिवकालीन नाणी तसेच घरगुती परिमाणे, मनोरंजनाची साधने अशा स्वरूपात हे प्रदर्शन भरणार आहे. हे प्रदर्शन शिवरायांच्या शौर्याची साक्ष देईल. तसेच आजच्या पिढीला आपल्या पूर्वजांच्या थोर वारस्याची ओळख होईल व त्यांचे विचार अंगीकृत करण्यासाठी प्रेरणा मिळेल हा प्रदर्शन ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश आहे.                         

            या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. कर्नल जे. पी. सत्तिगिरी तसेच मा. कर्नल दिनेशकुमार झा, अॅडम ऑफिसर १९ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी, कराड  यांचे हस्ते होणार आहे. यावेळी मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष मानसिंगराव कुमठेकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. दरम्यान इतिहास संशोधन मंडळ, मिरज आणि  महाविद्यालयाचा इतिहास विभाग यांच्यात सामंजस्य करार होणार आहे. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, इतिहासप्रेमी, शिवप्रेमी तसेच समस्त नागरिकांना या नाविन्यपूर्ण, ऐतिहासिक प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी केले आहे. इतिहास विभागप्रमुख प्रा. सचिन बोलाईकर, प्रा. सुरेश रजपूत यांचे सहित महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सेवकवृंद कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.                    

फोटो कॅप्शन : 

        प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड.









No comments:

Post a Comment

Thanks for reply