बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या शुभम जाधव याची शिवाजी विद्यापीठ संघात निवड
कराड/ प्रतिनिधी:
श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कराड येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम रामचंद्र जाधव बी.ए भाग २ याने शिवाजी विद्यापीठ अंतर्गत झालेल्या आंतरविभागीय स्पर्धेत भालाफेक या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. तसेच ऋषिकेश साखरे बी.ए भाग ३ या विद्यार्थ्याने देखील गोळाफ़ेक या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सदर आंतरविभागीय स्पर्धा राजे रामराव महाविद्यालय, जत जिल्हा सांगली येथे ७ ते ९ नोव्हेंबर रोजी पार पडल्या. यापैकी शुभम जाधव याची निवड पुन्हा ३ डिसेंबर २०२२ पासून औरंगाबाद येथे होणाऱ्या अश्वमेध स्पर्धेसाठी झाली आहे. अश्वमेध स्पर्धेसाठी भालाफेक या क्रीडा प्रकारात त्याची शिवाजी विद्यापीठ संघात अभिनंदनीय निवड झाली आहे.
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. देवदत्त महात्मे, प्रा. गौरव पाटील यांनी या खेळाडूस मार्गदर्शन केले. बापूजी साळुंखे महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधा तसेच प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास यामुळेच आम्ही हे यश मिळवू शकलो अशा भावना सदर खेळाडूंनी व्यक्त केल्या. या दोन्ही खेळाडूंचे प्राचार्य, प्राध्यापक, महाविद्यालयीन सेवक, विद्यार्थी वर्गाकडून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment
Thanks for reply