बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे ए. डी. श्रॉफ वक्तृत्व स्पर्धेत यश
कराड/ प्रतिनिधी :
भारताच्या औद्योगिक विकासाचा जेव्हा इतिहास अभ्यासला जातो तेव्हा अर्देशीर दरबशा श्रॉफ उर्फ ए. डी. श्रॉफ या प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्वाचे नाव प्राधान्याने घेतले जाते. भारतातील एक नामांकीत अर्थतज्ञ व पर्यावरणवादी म्हणून आजही त्यांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते. त्यांच्याच संकल्पनेतून देशभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आर्थिक विषयांवर विचार करण्यास व बोलण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ए. डी. श्रॉफ मेमोरियल ट्रस्टच्या वतीने ए.डी. श्रॉफ स्मरणार्थ वक्तृत्व स्पर्धांचे देशभरात आयोजन केले जाते.
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे नुकत्याच या ५६ व्या ए.डी.श्रॉफ वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत कु. युक्ता कांबळे हिने प्रथम क्रमांक (२५०० रुपये रोख व प्रमाणपत्र) द्वितीय क्रमांक कु. ऋतिका चाळके (१५०० रुपये रोख व प्रमाणपत्र) तृतीय क्रमांक सचिन कांबळे (१००० रुपये रोख व प्रमाणपत्र) तर कु. वैशाली चव्हाण, कु. श्रुती कांबळे यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड तसेच प्रा. विश्वनाथ सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर स्पर्धा पार पडल्या.
स्पर्धेसाठी कोरोना काळातील अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन, २०१७ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचे ५ ट्रिलियन डॉलर्सचे लक्ष, विकसनशील देशांच्या वित्तपुरवठ्यात आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची बदललेली भूमिका तसेच सायबर गुन्ह्यांचा वाढता उपद्रव व त्यावरील उपाय योजना असे चार विषय होते. .
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. सुभाष कांबळे, प्रा. सचिन बोलाईकर, डॉ. दयानंद कराळे यांनी काम पाहिले. तर स्पर्धा संपन्न करण्यासाठी प्रा. विश्वनाथ सुतार, प्रा. रत्नाकर कोळी, प्रा. सविता येवले यांनी परिश्रम घेतले. यशस्वी स्पर्धकांचे प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
फोटो कॅप्शन :
ए.डी. श्रॉफ वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी स्पर्धकांना शुभेच्छा देताना प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, प्रा. विश्वनाथ सुतार, प्रा. सचिन बोलाईकर, प्रा. सुभाष कांबळे आदी. मान्यवर
No comments:
Post a Comment
Thanks for reply