शिवाजी विद्यापीठ
सातारा विभागीय क्रीडा 58 व्या मैदानी स्पर्धा 2022-23
बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे विभागीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश
कराड /प्रतिनिधी :
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कराड येथील शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचा विद्यार्थी ऋषिकेश साखरे बी.ए भाग-३ याने शिवाजी विद्यापीठ अंतर्गत झालेल्या सातारा विभागीय अॅथलेटिक्स स्पर्धेत गोळा फेक व थाळीफेक या क्रीडा प्रकारात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला. तर शुभम जाधव बी.ए भाग- २ याने देखील भालाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.
सदर स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियम, सातारा येथे २ ते ४ नोव्हेंबर रोजी पार पडल्या. या विजयी खेळाडूंची निवड शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय स्पर्धांसाठी झाली आहे. आंतरविभागीय स्पर्धा राजे रामराव महाविद्यालय, जत येथे ७ ते ९ नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. देवदत्त महात्मे, प्रा. गौरव पाटील यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांची प्रेरणा मोलाची ठरली असे विद्यार्थ्यांनी आवर्जून नमूद केले. सदर खेळाडूंचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी वर्गाकडून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment
Thanks for reply