Thursday, October 6, 2022

स्पर्धा परीक्षेतील पदं तुम्हाला साद घालत आहेत - डॉ. महेश गायकवाड (अर्थशास्त्र विभाग)

स्पर्धा परीक्षेतील पदं तुम्हाला साद घालत आहेत. 

                                                            - डॉ. महेश गायकवाड                कराड/प्रतिनिधी: 

        आजचे युग हे स्पर्धा परीक्षेचे आहे. प्रचंड स्पर्धा असली तरी तेवढाच दर्जा असणारी पदं तुम्हाला साद घालत आहेत. गरज आहे ती फक्त चिकाटीने अभ्यास करण्याची, समाजात प्रतिष्ठे सोबतच जनसामान्यांची सेवा करण्याची संधी या पदामधून मिळत असते. तेव्हा जिद्दीने अभ्यास करा आम्ही तुमच्यासोबत आहोतच असे प्रतिपादन प्र.प्राचार्य डॉ. महेश गायकवाड यांनी केले. शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित 'अर्थविश्व' सदराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख उपस्थितीत अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. एम. एस. सूर्यवंशी होते.                                             

        डॉ. गायकवाड पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम महाविद्यालयात राबवले जात आहेत. विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने या उपक्रमात उस्फुर्त सहभागी होत असल्याने त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. प्रा. डॉ. एम. एस. सूर्यवंशी म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने अर्थशास्त्रातील विविध संकल्पना तसेच आर्थिक घडामोडींचा दैनंदिन आढावा घेणे गरजेचे आहे. एकंदरीतच विद्यार्थी आर्थिक साक्षर होण्याची गरज आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. एम. एस. सूर्यवंशी यांनी केले. स्वागत निखिल चव्हाण तर अर्थविश्व सदराची माहिती भालचंद्र कांबळे याने दिली. कार्यक्रमाचे आभार आफताफ कागदी यांनी मानले. कार्यक्रमास अर्थशास्त्र विभागातील प्रा. रवीकुमार अवसरे, प्रा. जयदीप चव्हाण व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.              


फोटो कॅप्शन : 

    अर्थविश्व सदराच्या उद्घाटन प्रसंगी प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. एम. एस. सूर्यवंशी, प्रा. रवीकुमार अवसरे, प्रा. जयदीप चव्हाण















1 comment:

Thanks for reply