Thursday, October 6, 2022

जैवविविधतेचा नैसर्गिक अधिवास संपुष्टात येत आहे - प्रा.अवधूत कुलकर्णी (भूगोल विभाग )

जैवविविधतेचा नैसर्गिक अधिवास संपुष्टात येत आहे. 

          प्रा.अवधूत कुलकर्णी   

कराड/ प्रतिनिधी  - 

        कास पठार महाराष्ट्रातला स्वर्ग असून सातारा जिल्ह्याचे पर्यटन भूषण आहे. निसर्गाने मुक्तहस्ते कास पठारावर अगणित रंगांची उधळण केली आहे. परंतु पर्यटकांच्या बेजबाबदार पर्यटनामुळे तेथील जैवविविधतेचा नैसर्गिक अधिवास संपुष्टात येत आहे. त्यामुळे कास पठारच नव्हे तर प्रत्येक पर्यटन स्थळाला भेट देताना पर्यटकांचे जबाबदारी पूर्ण वर्तन असावे असे प्रतिपादन प्रा. अवधूत कुलकर्णी यांनी केले.                                         

        बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे भूगोल विभागाच्या वतीने आयोजित पर्यटन दिनाच्या निमित्ताने ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अशोक खोत होते. प्रमुख उपस्थितीत भूगोल विभागप्रमुख प्रा. सुभाष कांबळे, प्रा. सचिन बोलाईकर होते.                           

        प्रा. कुलकर्णी पुढे म्हणाले, युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीत भारतातील ४० स्थळे आहेत. त्यामध्ये ३२ सांस्कृतिक स्थळे, ०७ नैसर्गिक स्थळे व एका संमिश्र स्थळाचा उल्लेख आहे. तर महाराष्ट्रात ०५ जागतिक वारसा स्थळे आहेत. यांचे जतन व संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे.                  

        कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रा. अशोक खोत म्हणाले, पर्यटन हा जगातील एक प्रमुख व्यवसाय असून पर्यटनामुळे प्रत्येक देशाला परकीय चलन मिळते. भिन्नभिन्न समाजातील देशातील लोकांचा संपर्क पर्यटनामुळे निर्माण होतो. राष्ट्रीय एकात्मतेस अत्यंत पोषक अशी वैचारिक देवाण-घेवाण पर्यटनामुळे होते. आंतरराष्ट्रीय सामंजस्य वाढण्यासाठी मदत होते.         

            प्रा. सुभाष कांबळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन कु. अश्विनी सावंत तर आभार डॉ. प्रवीण साळुंखे यांनी मानले. कार्यक्रमास प्रा. शोभा लोहार, प्रा. तबस्सुम आतार, प्रा. सुनिता पवार, प्रा. सीमा कणसे. आदी उपस्थित होते. 

फोटो कॅप्शन : 

    पर्यटन दिनानिमित्त मार्गदर्शन करताना प्रा. अवधूत कुलकर्णी सोबत भूगोल विभागप्रमुख प्रा. सुभाष कांबळे, प्रा. सचिन बोलाईकर, प्रा अशोक खोत







1 comment:

Thanks for reply