Tuesday, January 27, 2026

श्रमातून संस्कार आणि संस्कारातून व्यक्तिमत्त्वाचा विकास फुलवणारे व्यासपीठ म्हणजे विशेष श्रमसंस्कार शिबिर ______प्राचार्य डॉ. लालासाहेब जाधव.

 

 

A person speaking into a microphone

AI-generated content may be incorrect.


  श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलीत, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे कालवडे 3 जानेवारी 2026 ते 9 जानेवारी 2026 या कालावधीत  संपन्न होत आहे. शिबिराचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कडेपुर जिल्हा सांगली चे मा. प्राचार्य लालासाहेब जाधव होते आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, श्रमातून संस्कार आणि संस्कारातून व्यक्तिमत्त्वाचा विकास फुलवणारे व्यासपीठ म्हणजे विशेष श्रमसंस्कार शिबिर होय. राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे मी स्वतःसाठी नाही तर तुमच्यासाठी आहे. स्वतःसाठी जगलास तर मेलास. इतरांसाठी जगलास तरच खऱ्या अर्थाने जगलास हे तत्त्वज्ञान या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वरती बिंबवले जाते. यातूनच विद्यार्थी घडतात. देशाचे भावी आदर्श नागरिक नागरिक बनण्यास मदत होते. . राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केवळ समाजसेवा म्हणून श्रमाचे संस्कार होत नाहीत तर स्वतःच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये चांगले बदल घडवणारे हे व्यासपीठ आहे, याचा लाभ विद्यार्थ्यांना घेता आला पाहिजे महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला. परंतु या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला खेडे गावचा विकास करण्याची संधी मिळते. सात दिवसाच्या या शिबिरात आपण सर्व विद्यार्थी स्वयंसेवक स्वयंसेविका मिळून नक्कीच ग्रामविकासात मोलाचा सहभाग द्याल अशी मी अशा व्यक्त करतो. व शिबिराचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करतो. 

           उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, स्वयंसेवकांनी सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा योजना समजून घेतली पाहिजे व आपले योगदान समाजासाठी दिले पाहिजे. या योजनेतून आपल्यामध्ये केवळ श्रमाचे संस्कार येणार नाहीत तर आपल्यातील नेतृत्व गुण, आपल्यात लपलेला कलाकार व आपल्यात असणारा देशाचा आदर्श नागरीक तयार होणार आहे. कालवडे गाव व आपले महाविद्यालय यांचे ऋणानुबंध खूप वर्षापासून आहेत. या शिबिराच्या माध्यमातून ते जपण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. 

             या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामपंचायत सदस्य सौ गीतांजली थोरात व ग्रामपंचायत सदस्य बालेश राव थोरात यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष या गावचे प्रथम नागरिक सरपंच मा. सुदाम मोटे होते. तसेच गावच्या पोलीस पाटील  सौ शुभांगी गाडे  उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Thanks for reply