Tuesday, January 27, 2026

शाश्वत शेतीसाठी मृदा व पाणी परीक्षण करणे काळाची गरज____ प्रो डॉ. रत्नदीप जाधव.

 

शाश्वत शेतीसाठी मृदा व पाणी परीक्षण करणे काळाची गरज____ प्रो डॉ. रत्नदीप जाधव.

A group of men sitting at a table in front of a screen

AI-generated content may be incorrect.


 श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय येथे बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत भूगोल विभागाच्या वतीने  मृदा व पाणी परीक्षण या विषयावरती कार्यशाळा संपन्न झाली. सत्र एकचे साधन व्यक्ती प्रो. डॉ. रत्नदीप जाधव विलिंगडन महाविद्यालय सांगली हे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, भारतासारख्या कृषिप्रधान देशात शाश्वत शेतीसाठी मृदा व पाणी परीक्षण करणे काळाची गरज आहे. पृथ्वीच्या भूपृष्ठावरील नऊ इंच मातीचा थर टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण यातूनच आपल्याला शेती करता येते. तो थर निघून गेला तर जमीन नापीक बनते. यासाठी मृदेत कोणते घटक आवश्यक आहेत. मृदा संवर्धनासाठी काय केले पाहिजे. याचे उत्तर मृदा परीक्षणातूनच मिळते. पाणी म्हणजे जीवन त्यामुळे आपण पिण्यासाठी जे पाणी वापरतो ते पिण्यायोग्य आहे की नाही यासाठी पाणी परीक्षण तितकेच महत्त्वाचे आहे. पाण्याचा टीडीएस किती पीएच किती हे तपासूनच  आपण त्याचा वापर केला पाहिजे. येणाऱ्या पिढीसाठी शेती योग्य जमीन व पिण्यायोग्य पाणी संवर्धन करणे काळाची गरज आहे.  

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे  होते. आपल्या अध्यक्षीय मनोगता ते म्हणाले, मृदा व पाणी परीक्षण या विषयावरील महाविद्यालयात होणारी कार्यशाळा हा एक स्तुत्य उपक्रम आहे. कारण आपण सर्वजण शेतकरी कुटुंबातील आहोत. तसेच पिण्यायोग्य पाणी मिळणे ही प्रत्येकाची गरज आहे. मृदा व पाणी परीक्षणामुळे आपले जीवन सुरक्षित होण्याचा रामबाण उपाय मिळेल. या कार्यशाळेसाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो! 

         या कार्यक्रमासाठी अग्रणी महाविद्यालय अंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ. सुभाष कांबळे यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्रा. दीपक गुरव यांनी केला आभार आग्रणी प्रमुख प्रा. विश्वनाथ सुतार यांनी व्यक्त केले. तर सूत्रसंचालन डॉ. शितल गायकवाड यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Thanks for reply