Tuesday, January 27, 2026

समाजाच्या प्रगतीसाठी स्त्रियांचे आरोग्य जपणे काळाची गरज :- अश्विनी आलदर.

 

समाजाच्या प्रगतीसाठी स्त्रियांचे आरोग्य जपणे काळाची गरज :- अश्विनी आलदर.

 

A group of people in a classroom

AI-generated content may be incorrect.

 

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाच्या निमित्ताने महिला सबलीकरण आणि लैंगिक समानता कक्षाच्या वतीने महिलांचे आरोग्य या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते प्रमुख मार्गदर्शिका अश्विनी आलदर संस्थापक कॉटन ग्रीन सॅनिटरी नॅपकिन्स या होत्या आपल्या मार्गदर्शनात त्या म्हणाल्या प्रगतीसाठी महिलांचे आरोग्य जपणे काळाची गरज आहे. 

 स्त्री ही कुटुंबाची आणि समाजाची आधारस्तंभ असते. त्यामुळे तिचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. विशेषतः मासिक पाळीच्या काळात स्वच्छता राखणे हे स्त्रीच्या आरोग्याशी थेट संबंधित असते. या काळात सॅनिटरी नॅपकिनचा वापर केल्याने शरीर स्वच्छ राहते. संक्रमण टळते आणि आत्मविश्वास वाढतो. पूर्वी अनेक स्त्रिया वापरलेले कापड पुन्हा वापरत असत. ज्यामुळे संसर्ग आणि त्वचेचे आजार होण्याचा धोका वाढायचा. परंतु सॅनिटरी नॅपकिनच्या वापरामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. हे नॅपकिन्स मऊ, शोषक आणि वापरण्यास सोयीस्कर असल्यामुळे महिलांना शाळा, कामाची ठिकाणे किंवा प्रवास यांमध्येही निर्भयपणे राहता येते. यामुळे केवळ स्त्रियांचे आरोग्य सुधारत नाही, तर त्यांचा आत्मविश्वास आणि सामाजिक सहभागही वाढतो. सॅनिटरी नॅपकिनचा वापर हा आरोग्य, स्वच्छता आणि स्त्री सक्षमीकरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीपर्यंत याचा प्रसार होणे आवश्यक आहे, कारण निरोगी स्त्री म्हणजे निरोगी समाज.

           कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते, आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले संपूर्ण आयुष्यात स्त्रियांना विविध भूमिका निभवाव्या लागतात. कधी आई, पत्नी, सून, सासू, नणंद अशा अनेक भूमिका निभावत असताना त्या कुटुंबाची काळजी करत असतात मात्र त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे त्यांनी वेळीच आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. कारण ज्या समाजात स्त्रिया सक्षम असतात तोच समाज प्रगती करत असतो.

                 कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सोनाली रांगोळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. मनाली रानडे यांनी केला. प्रा. ऋतुजा भाटले यांनी आभार व्यक्त केले. तर सूत्रसंचालन प्रा. रुकय्या  शेख यांनी केले. कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक सुरेश यादव,सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी, गुरुदेव कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Thanks for reply