Tuesday, January 27, 2026

रा.से.यो विशेष श्रमसंस्कार शिबिरात काव्य सुरांनी रंगली सायंकाळ.

 

रा.से.यो विशेष श्रमसंस्कार शिबिरात काव्य सुरांनी रंगली सायंकाळ.

A group of people sitting in chairs

AI-generated content may be incorrect.


श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामपंचायत कालवडे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या विशेष संस्कार शिबिरात कवी संमेलन अत्यंत उत्साहात संपन्न झाले. कवी थळेन्द्रकुमार लोखंडे व कवी उद्धव पाटील यांच्या काव्य सुरांनी सायंकाळची वेळ रंगून गेली. अनंत अडचणीतून संघर्षाची वाट तुडवताना कविता जन्म घेते. कविता जगायला शिकवते. जनसामान्याच्या वेदनेला वाचा फोडते. चळवळीतील तरुणाला ऊर्जा देते. थकलेल्या भागलेल्या देहाला जगायची स्फूर्ती देते. असे प्रतिपादन कवी थंळेन्द्र कुमार लोखंडे यांनी केले.

               कवी उद्धव पाटलांनी छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांची आठवण आपल्या काव्यातून करून दिली. युवकांना खऱ्या तारुण्याची जाणीव करून दिली. त्यांनी प्रेम कविता, सामाजिक व देशभक्तीपर कवितांचे गायन केले. तसेच स्वयंसेवक विद्यार्थी व प्राध्यापकांनीही आपल्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य बालेशराव थोरात होते. मानवी जीवनाचे मर्व मर्म कविता शिकवते. समाजाच्या वेदना कविता दाखवते. विद्यार्थ्यांनी कवितेचा छंद जोपासावा.

                कार्यक्रमाचे प्रास्ताविक, परिचय, स्वागत, आभार, सूत्रसंचालन स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम अधिकारी डॉ. मारुती सूर्यवंशी, प्रा. रघुनाथ गवळी, प्रा.अण्णासाहेब पाटील व सर्व कमिटी सदस्यांनी केले. कवी संमेलनासाठी ग्रामस्थ, स्वयंसेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Thanks for reply