Tuesday, October 14, 2025

जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेत शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे उज्वल यश

 

जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेत शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे उज्वल यश

 

 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत सातारा जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धा वाई येथे सहभाग घेतला व उज्वल यश संपादन केले. त्याबद्दल कराड व परिसरातून सर्वत्र अभिनंदन होत आहे. सदर स्पर्धा 10 ऑक्टोंबर 2025 शुक्रवार रोजी किसनवीर महाविद्यालय वाई जिल्हा सातारा येथे संपन्न झाली. या स्पर्धेत ह्युमॅनिटीज लैंग्वेज अँड फाईन आर्ट या विद्याशाखेअंतर्गत भूगोल विभागाची विद्यार्थिनी प्रणाली नथुराम जगदाळे हिने 'मृदा परीक्षण निरक्षरता कृषी विकासातील आव्हान' या विषयावरील सादर केलेल्या पोस्टरला द्वितीय क्रमांक मिळाला. तसेच कॉमर्स मॅनेजमेंट अँड लॉ या प्रकारात अर्थशास्त्र विभागाचा विद्यार्थी वकार अहमद मुजावर याने 'पोल्ट्री व्यवसाय आर्थिक सक्षमीकरणाचे साधन' या विषयावरील संशोधन प्रकल्प  पोस्टरला तृतीय क्रमांक मिळाला. दोन्ही विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे होणाऱ्या विधापीठ स्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेत निवड झाली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे यांनी या सर्वांचे अभिनंदन केले. या सर्व विद्यार्थ्यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमारजी साळुंखे, संस्थेच्या सचिव प्राचार्य सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे यांची प्रेरणा मिळाली.

           सदर अविष्कार  संशोधन स्पर्धेमध्ये भूगोल विभागाची द्वितीय क्रमांक मिळालेली विद्यार्थिनी प्रणाली जगदाळे हिला प्रा. दीपक गुरव  यांचे मार्गदर्शन लाभले तर अर्थशास्त्र विभागाचा तृतीय क्रमांक मिळालेला विद्यार्थी वकार मुजावर याला डॉ. मारुती सूर्यवंशी अविष्कार संशोधन प्रमुख व स्पर्धा संघ प्रमुख, तसेच अर्थशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापकांचे यांचे मार्गदर्शन लाभले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अविष्कार संशोधन समितीचे सदस्य डॉ. स्वाती मोरकळ, डॉ.आशा सावंत, डॉ. शितल गायकवाड यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Thanks for reply