Tuesday, October 14, 2025

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात एनसीसी रँक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

 

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात एनसीसी रँक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

A group of men standing in front of a white board

AI-generated content may be incorrect.


श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात एनसीसी रँक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य प्रोफेसर डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, महाविद्यालयीन शिक्षणात एनसीसी युनिट हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यात सहभागी होणारे विद्यार्थी शिस्तबद्ध होतात. त्यांच्या जीवन चारित्र्यात  शिस्त आपोआप दिसून येते. एनसीसीतील विद्यार्थ्यांनी चुका टाळल्याच पाहिजेत कारण समाज त्यांच्याकडे  सैनिक म्हणूनच बघत असतो. वरिष्ठांचे आज्ञा पालन करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. जो विद्यार्थी एनसीसी प्रमुख असेल म्हणजे सार्जंट किंवा ज्युनियर अंडर ऑफिसर यांनी विद्यार्थ्यांच्या पुढे स्वतःचा आदर्श निर्माण केला पाहिजे. जेणेकरून इतर विद्यार्थीही त्यांच्यासारखे चांगले घडतील. जेव्हा छात्र सैनिक अंगावरती वर्दी चढवतो तेव्हा त्या वर्दीचा आदर राखणे ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे.  रँक मिळत असतात परंतु त्याचबरोबर जबाबदाऱ्यांचे पालन ही तितकेच महत्त्वाचे आहे. रँक मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो.

       या कार्यक्रमात महाविद्यालयाचे जेष्ठ प्रा. सचिन बोलाईकर यांनी मनोगत व्यक्त केले तसेच SUO अभय भाकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले सर्व पात्र एनसीसी कॅडेट ना वेगवेगळ्या रँक कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. सतीश घाटगे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक वितरित करण्यात आल्या. यामध्ये SUO म्हणून अभय भाकरे यांना रँक मिळाली तर ज्युनिअर अंडर ऑफिसर म्हणून अथर्व गरुड याची नियुक्ती झाली. कार्यक्रमात एनसीसी विभागाने 2024 25 कालावधीत केलेल्या विविध उपक्रमांच्या अहवालाचे वाचन एनसीसी प्रमुख प्रा. दीपक गुरव यांनी केले.

             कार्यक्रमासाठी व्यासपीठावर एनसीसी च्या GCA युक्ता कांबळे उपस्थित होत्या. सर्व एनसीसी कॅडेट विद्यार्थी विद्यार्थिनी व सर्व गुरुदेव कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आर. बी. कोळी यांनी केले सूत्रसंचालन डॉ. सारिका लाटवडे यांनी केले. आभार प्रा. सविता येवले यांनी मानले. कार्यक्रमासाठी श्री पंकज कुंभार व श्री प्रकाश पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Thanks for reply