रासेयो
च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कर्तव्याला कृतीची जोड मिळाल्याने, राष्ट्राचा शाश्वत विकास साधता येतो.
______ प्रा. जालिंदर काशीद.
श्री.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे
महाविद्यालय कराड येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन व शैक्षणिक वर्ष 2025 26 चे उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्रा. जालिंदर काशीद होते. आपल्या मार्गदर्शनात
ते म्हणाले, राष्ट्रीय
सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कर्तव्याला कृतीची जोड मिळाल्याने
राष्ट्राचा शाश्वत विकास होतो. आपल्या अवतीभवती विविध समस्या आहेत. त्या एक दिवसात
किंवा काही क्षणात संपणाऱ्या नसतात. त्या निरंतर उपलब्ध असतात. त्या कमी
करण्यासाठी आपले प्रयत्न सतत असले पाहिजे. आधुनिक युगात ज्ञान तंत्रज्ञानाचा वापर
वाढत आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास देखील होत आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचे
संरक्षण हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. हेच कर्तव्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या
माध्यमातून आपल्याला करण्याची संधी आहे. पर्यावरण विषयक अनेक कायदे आहेत. परंतु
प्रत्यक्ष कायदा अंमलबजावणी होत नाही. भ्रष्टाचाराचा परिणाम हे देखील प्रदूषणाचे
एक कारण बनले आहे. एनएसएस च्या माध्यमातून आपण गावोगावी शिबिरे घेतो. या
शिबिराच्या माध्यमातून प्लास्टिक निर्मूलन,ग्राम स्वच्छता, वनराई बंधारे, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, इत्यादी उपक्रम प्रत्यक्ष राबवण्याची संधी आपल्याला
मिळत असते. आणि यातूनच कृतिशील समाजसेवा घडते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.
डॉ.सतीश घाटगे होते आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच मी माझ्यासाठी
नाही.आपल्यासाठी आहे. नॉट मी बट यु म्हणजेच समाजसेवेची संधी या योजनेतच मिळते. या
योजनेत काम केल्याने राष्ट्रप्रेमी नागरिक नक्कीच घडतात व तेच या देशाच्या शाश्वत
विकासात भर घालतात. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपला प्रत्यक्ष समाजाशी
सहसंबंध निर्माण होतो त्यामुळे त्यांच्या समस्या, उपाय याचा मार्ग मिळू शकतो.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांचा परिचय रा. से.
यो. कार्यक्रमाधिकारी डॉ. मारुती सूर्यवंशी यांनी केले. प्रास्ताविक कार्यक्रम
अधिकारी प्रा.रघुनाथ गवळी यांनी केला. आभार कार्यक्रम अधिकारी प्रा.अण्णासाहेब
पाटील यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन डॉ. शितल गायकवाड यांनी केले. या
कार्यक्रमासाठी सीनियर व ज्युनिअर विभागाचे सर्व एनएसएस सदस्य, तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक बंधू भगिनी
बहुसंख्येने उपस्थित होते.