सहस्त्र सूर्य एकत्र केले तरी सत्याची बरोबरी नाही
- डॉ. महेश गायकवाड
कराड /प्रतिनिधी:
संयुक्त राष्ट्र संघाने २ ऑक्टोबर हा दिवस जागतिक अहिंसा दिवस म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे महात्मा गांधी यांची जयंती ही भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात साजरी केली जाते. सत्य अहिंसा या बापूजींच्या तत्त्वाचा भारतीय समाजावर मोठा प्रभाव पडलेला आहे. त्यामुळेच गांधी जयंतीचे औचित्य साधून गांधींचे विचार समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड यांनी केले.
बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित भितीपत्रिका उद्घाटनाच्या निमित्ताने ते बोलत होते. प्रमुख उपस्थितीत डॉ. अवधूत टिपुगडे, प्रा. गोरख गायकवाड, प्रा. महेश लोहार, डॉ. ज्योती कांबळे आदी. उपस्थित होते.
सत्याचे महत्व विशद करताना डॉ. गायकवाड पुढे म्हणाले, सहस्त्र सूर्य एकत्र केले तरीही सत्याची बरोबरी होणार नाही. सत्यावरच जगाचे मार्गक्रमण चालू आहे. त्यामुळे बापूजींनी सांगितलेल्या सत्याच्या मार्गावरच चालणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अवधूत टिपूगडे यांनी केले. श्रुती कांबळे हिने मनोगत व्यक्त केले. मोमीन सादिया, ज्योती कुंभार, संकेत कांबळे, सचिन कांबळे या विद्यार्थ्यांनी भित्तिपत्रिकेसाठी संकलन व लेखन केले. संकेत कांबळे यांनी आभार मानले. याप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
फोटो कॅप्शन :
'राष्ट्रपिता महात्मा गांधी' भित्तिपत्रिकेचे उद्घाटन करताना प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड सोबत डॉ. अवधूत टिपूगडे, प्रा. गोरख गायकवाड, प्रा. महेश लोहार, डॉ.ज्योती कांबळे
👌👌💐
ReplyDelete