Thursday, October 15, 2026

वाचन प्रेरणा दिन 15 October 2026

 

वाचन, मनन, आणि चिंतन हीच सुदृढ बुद्धिमत्तेची त्रिसूत्री:- प्राचार्य प्रो.डॉ.सतीश घाटगे

 वाचन, मनन, आणि चिंतन हीच सुदृढ बुद्धिमत्तेची त्रिसूत्री:- प्राचार्य प्रो.डॉ.सतीश घाटगे

 कराड - प्रतिनिधी.

 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे, ग्रंथालय विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त व वंदे मातरम या गीतास दीडशे वर्ष पूर्ण झाली. या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिन उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, वाचन, मनन, आणि चिंतन हीच सुदृढ बुद्धिमत्तेची त्रिसूत्री आहे. वाचनाने माणूस घडतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भारताचे मिसाईल मॅन, थोर संशोधक, कुशाग्र बुद्धिमत्तेचे शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आहेत. त्यांनी भारताच्या अण्वस्त्र संशोधनात शिखर रचले आहे. एक सामान्य विद्यार्थी वाचनातून गगनचुंबी यश संपादन करू शकतो. विद्यार्थ्यांनी विविध ग्रंथांचे वाचन केले पाहिजे . ग्रंथ हेच आपले गुरु आहेत. ग्रंथासारखा मौल्यवान ठेवा विद्यार्थ्यांच्यासाठी ग्रंथालयात मुबलक प्रमाणात आहे. त्याचा सातत्याने वापर केला पाहिजे. मोबाईल युगामध्ये सर्वांचेच वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. यावरती ही लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्यात वाचन संस्कृती वाढावी यासाठी ग्रंथालय, एनएसएस व एनसीसी या विभागांनी आयोजित केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. महाविद्यालयात असे उपक्रम नियमितपणे साजरे होत असतात. यातून चांगले सुसंस्कार होतात. या कार्यक्रमात बंकिमचंद्र चटर्जी व वंदे मातरम जन्म कथा याचे उपस्थित सर्वांनी सामूहिक मूक वाचन केले. या कार्यक्रमासाठी जूनियर विभागाचे पर्यवेक्षक प्रा. सुरेश रजपूत, एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा. रघुनाथ गवळी, प्रा. अण्णासाहेब पाटील, एनसीसी प्रशिक्षक दिलीप सपकाळ, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. रत्नाकर कोळी, हिंदी विभाग प्रमुख प्रा. विश्वनाथ सुतार, प्रा. सविता येवले, प्रा. भक्ती भालदारे, प्रा. शितल सालवाडगी , प्रा. शैला चोबे डॉ. अभिजीत दळवी, डॉ. सारिका लाटवडे, दिपाली वाघमारे, प्रा. डी. एच रास्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय ग्रंथालय प्रमुख प्रा.सोनाली रांगोळे यांनी केले. आभार प्रा. तेजस्विनी दळे यांनी व्यक्त केले तर सुत्रसंचालन प्रा स्मिता कालभूषण यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी व सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.















No comments:

Post a Comment

Thanks for reply